Satara Politic's : साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी राजघराणे इंट्रेस्टेड? मंत्री शिवेंद्रराजेंच्या पत्नीसह दोन बडी नावे रेसमध्ये

NagarPalika Election 2025 : सातारा नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर वृषालीराजे व वेदांतिकाराजे भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
vrushali raje bhosale -vedantikaraje bhosale
vrushali raje bhosale -vedantikaraje bhosale Sarkarnama
Published on
Updated on
  1. सातारा नगराध्यक्षपदावर राजघराण्याची चर्चा:
    खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद जाहीर झाल्यानंतर वृषालीराजे भोसले आणि वेदांतिकाराजे भोसले या दोन्हींची नावं चर्चेत असून, राजघराण्यातील व्यक्तींच्या निवडणूक मैदानात उतरण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  2. प्रभागवार इच्छुकांची चाचपणी सुरू:
    विविध प्रभागांमध्ये राजघराण्याशी निकटवर्तीय आणि क्रीडाक्षेत्रातील सक्रिय व्यक्तींना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, जसे की शशांक ढेकणे, धन्वंतरी वांगडे, शंकर किर्दत आदी.

  3. भाजपकडून मुलाखती पूर्ण:
    १० नोव्हेंबर रोजी भाजपकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, मात्र अंतिम उमेदवाराचे नाव ऐनवेळी बदलले जाऊ शकते, अशी शक्यता आहे.

Satara, 11 November : साताऱ्याचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर राजघराण्याचे ज्येष्ठ नेते (कै.) शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले या दोन नावांची जोरदार चर्चा झाली आणि आजही सुरू आहे. राजघराण्यातील व्यक्तींबरोबरच शहरातील विशिष्ट प्रभागांमध्ये राजघराण्याशी निगडित, निकटवर्तीयांची नगरसेवक पदासाठीची चर्चा होत आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी सोमवारी मुलाखती दिल्या; त्यात राजघराण्यातील (Royal family) कोणाचाही समावेश नाही. पण, ऐनवेळी त्यांचे नाव पुढे येऊ शकते. राजकारणाचे धडे गिरविण्याची वेळ आल्यास (राजघराण्याचा आदेश) त्यांना तेही करावे लागेल, अशीही चर्चा आहे.

राजकारणाच्या मैदानात खेळाडूंचा आवाज घुमायला हवा, अशी भूमिका घेत पालिकेत पाठविण्यासाठी त्यांचे गट सज्ज झाले असले तरी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्याकडे ‘मला द्या... मला द्या...’ अशी उमेदवारी मागायला कोण जाईल, अशी शक्यता फारच कमी असल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक १६

विसावा नाका येथील येथील यश मित्र समूहाचे अध्यक्ष विनायक कांबळी यांचा एक गट त्यांना उमेदवारी दिली जावी, यासाठी सक्रिय झाला आहे. कांबळी यांनी फुटबॉल खेळाच्या माध्यमातून युवकांचे संघटन केले आहे. स्टार क्रिकेट क्लबचे प्रमुख संघटक किरण राजेभोसले यांच्या पत्नी रश्मी राजेभोसले यांनी मैदानात उतरावे, यासाठी परिसरासह क्रीडा क्षेत्रातील लोकांनी त्यांची भेट घेतली. रश्‍मी यांच्या भावजय वैशाली या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने तसेच, दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले, तर मिठात खडा नको; म्हणून त्यांनी सध्या तरी त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक सहा

(कै.) प्रतापसिंह दादा महाराज दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेच्या वर्षानुवर्षे आयोजन करणारे शशांक ऊर्फ बाळासाहेब ढेकणे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रभागातील युवा पिढीने खासदार उदयनराजे भोसलेंकडे आग्रह धरला आहे. ज्येष्ठ नेते (कै.) शिवाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला बाळासाहेबांचा प्रवास उदयनराजे यांचे घनिष्ठ मित्र इथपर्यंत जाऊन पोहोचला. राजेंनी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत संधी दिली. आता निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना लढण्याची संधी द्यावी, यासाठी करंजे एकवटल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक २५

राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या संस्कारात व सहवासात वाढलेल्या आणि राजघराण्यातील निकटवर्तीय धन्वंतरी कदम-वांगडे यांचा शहरात मोठा मित्र परिवार आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून राजकारणातील मैदान गाजवावे, यासाठी मित्र परिवार प्रयत्न करीत आहेत. राजकारणात सक्रिय नसलेल्या; परंतु राजकीय वातावरणात वाढलेल्या आणि अदालतवाड्यातील अनुभवाच्या जोरावर धन्वंतरी या तूर्त तरी शांत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या धन्वंतरी या भाई वांगडे यांच्या सून असल्याने त्या निश्‍चित एक पाऊल पुढे टाकतील, अशी मात्र चर्चा आहे.

|

vrushali raje bhosale -vedantikaraje bhosale
Bjp News : भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी तयार; फडणवीस, चव्हाणांनी मारला शेवटचा हात

प्रभाग क्रमांक १४

पिढ्यान्‌पिढ्या राजकारणात असलेल्या गवळी कुटुंबातील निशांत गवळी यांनी नगराध्यक्षपदासाठी तयारी करावी, अशी इच्छा विविध क्रीडा संघटनांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिसून येत आहे. राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या निशांत यांनी मित्र परिवाराला स्पष्ट नकार देत गुरुवार तालीम संघाचे प्रमुख संघटक त्यांचे चुलत बंधू अक्षय गवळी यांना प्रभागात सहकार्य करणार असल्याचा निर्धार केला आहे.

प्रभाग क्रमांक एक

खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि युवकांचे संघटन करणाऱ्या शंकर किर्दत यांचे नाव प्रभाग क्रमांक एकमधून घेतले जाते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिली जावी, यासाठी उदयनराजे यांचा गट आग्रही दिसून येत आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा क्रीडा क्षेत्रातील मित्र परिवारही मनोमिलन झाल्यास शंकर यांच्या बाजूने ‘दादांनी’ कौल द्यावा, यासाठी जोर लावत असल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक २-३

सदर बझार परिसरातील क्रिकेटपटू सुजित जाधव यांना गतवेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी देऊ केली होती. त्यांनी नम्रपणे त्यांचे बंधू विशाल यांना द्यावी, असे सांगितल्यानंतर विशाल यांचा पालिकेत प्रवेश झाला; परंतु आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. आता पुन्हा सुजित यांना संधी चालून आली आहे. सुजित यांनी यावेळीही तुम्ही द्याल त्या प्रभागात मातोश्री शारदा जाधव यांना निवडून आणू, अशी जबाबदारी घेतल्याची चर्चा आहे.

राजकीय इनिंगसाठी या नावांची चर्चा

पंकज चव्हाण, डॉ. संजोग कदम, विनित पाटील, ऋतुराज आहेरराव, इर्शाद बागवान, संयोगिता माजगावकर, शीतल ऋतुराज आहेरराव, स्नेहल भालचंद्र निकम याबरोबरच अन्य नावांचीही चर्चा आहे.

vrushali raje bhosale -vedantikaraje bhosale
राणेंना होम ग्राऊंडवरच ठाकरेंच्या शिलेदाराकडून आव्हान? “शहर विकास आघाडी”त शिंदेंची शिवसेना दाखल होण्याची शक्यता?

यांनी दिल्या मुलाखती

सातारा नगरपालिकेच्‍या निवडणुकीसाठी नगराध्‍यक्ष तसेच नगरसेवकपदासाठी इच्‍छुक असणाऱ्यांच्‍या मुलाखती भाजपच्‍या वतीने सोमवारी (ता. १० नोव्हेंबर) घेण्‍यात आल्‍या. अशोक मोने, सुवर्णा पाटील, शिवानी कळसकर, सिद्धी पवार, अविनाश कदम, जयेंद्र चव्‍हाण, सुजाता राजेमहाडिक, अमोल मोहिते, निशांत पाटील, शंकर माळवदे, किशोर शिंदे, काका धुमाळ, डॉ. संजोग कदम, रवींद्र पवार, धनंजय जांभळे, सुहास राजेशिर्के, शरद काटकर, संजय शिंदे, संग्राम बर्गे आदींनी मुलाखती दिल्या. या सर्वांनी मुलाखत दिली असली तरी ऐनवेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव बदलू शकते.

Q1: सातारा नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे?
A1: सातारा नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे.

Q2: राजघराण्यातील कोणाची नावं चर्चेत आहेत?
A2: वृषालीराजे भोसले आणि वेदांतिकाराजे भोसले यांची नावं जोरदार चर्चेत आहेत.

Q3: भाजपने नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती कधी घेतल्या?
A3: भाजपने १० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

Q4: अंतिम उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे का?
A4: नाही, अंतिम उमेदवाराचे नाव ऐनवेळी बदलले जाऊ शकते, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com