Bjp News : भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी तयार; फडणवीस, चव्हाणांनी मारला शेवटचा हात

BJP local elections Maharashtra News : भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतीत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या तीन संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.
Devendra Fadnavis, ravindra chavan
Devendra Fadnavis, ravindra chavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 244 नगरपालिका व 44 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून येत्या सोमवारी (17 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षाची उमेदवार निवडीसाठी लगबग सुरु आहे. त्यातच आता भाजपने उमेदवार निवडीत आघाडी घेतली आहे. भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतीत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या तीन संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.

ही यादी जिल्ह्याच्या प्रभारीकडे सोपविली आहे. मंगळवारी होत असलेल्या बैठकीत या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असून येत्या दोन-तीन दिवसातच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis, ravindra chavan
BJP political strategy : राष्ट्रवादीच्या वाट्याला जास्त मुस्लिम मतदारसंघ; भाजपचा कुटील डाव झिरवळांनी सांगितला

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या तयारीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने त्यांच्या नगराध्यक्षपदासाठीच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयारी केली होती.

Devendra Fadnavis, ravindra chavan
Shivsena UBT crisis : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! कोकणात एकाचवेळी मुंबई संपर्कप्रमुख आणि शहरप्रमुखाने सोडली साथ

त्यावेळी भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येकी तीन नावे प्रभारीकडे दिली होती. त्यापैकी निवडणूक जिंकण्याची शक्यता अधिक असलेली तीन नावांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतर आता या तीन नावावर प्रत्येक ठिकाणी पक्षाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये आता हेच सर्वेक्षण भाजपच्या मंगळवारच्या बैठकीत ठेवले जाणार आहे. या तीन व्यतिरिक्त काही ठिकाणी सर्वेक्षणात चौथे नावही दिसत आहे. त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis, ravindra chavan
NCP SP : भाजपने दुर्लक्ष केलेल्या ढोबळेंवर राष्ट्रवादीकडून आणखी महत्वाची जबाबदारी; पित्यानंतर मुलीलाही प्रदेशवर संधी!

मंगळवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात होत आलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर कोअर कमिटीची एक बैठक घेऊन यामध्ये एक नाव अंतिम केले जाणार आहे. त्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसातच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis, ravindra chavan
Sharad Pawar यांचा नवीन पॅटर्न ; अनेकांना धडकी | NCP | Congres | BJP | Sarkarnama Video

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com