Rajya Sabha Seat: राष्ट्रवादीत खलबतं; राज्यसभेसाठी भुजबळ की सिद्दीकी? कोणाची लागणार वर्णी

NCP Ajit Pawar Group Rajya Sabha Seats Allocation Issue Chhagan Bhujbal Baba Siddiqui : काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी इच्छुक आहेत. त्यांनीही पक्षनेतृत्वाकडे मनधरणी करण्यास सुरवात केली आहे.
NCP Ajit Pawar Group Seats Allocation
NCP Ajit Pawar Group Seats AllocationSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीत राज्यसभेचे 10 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यसभेतील या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर लवकरच निवडणूक होणार असल्याचे राज्यसभा सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यसभेच्या काही सदस्यांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत. आसाम, महाराष्ट्र, बिहारमधील प्रत्येकी 2, तर मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा यात समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)आणि काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) इच्छुक असल्याचे बोलले जाते. भुजबळ की सिद्दीकी याबाबत पक्षाच्या नेत्यांच्या आज होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे.

NCP Ajit Pawar Group Seats Allocation
Dispute In Mahavikas Aghadi : महाआघाडीच्या ऐक्यात मिठाचा खडा; कोल्हेंनी ‘ते’ विधान करताच शिवसेना नेते संतापले!

या जागेसाठी छगन भुजबळ हे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे राज्यात ओबीसी समाजात सरकारबाबत नाराजी आहे. ओबीसींमधील ही नाराजी दूर करण्यासाठी ओबीसी सदस्य दिल्यास फायदा होईल, असे भुजबळांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

या जागेवर काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी इच्छुक आहेत. त्यांनीही पक्षनेतृत्वाकडे मनधरणी करण्यास सुरवात केली आहे. सध्या ते परदेशात असून लवकरच ते भारतात येणार असल्याचे समजते.

सिद्दीकी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाच्याअल्पसंख्याक विभागाची बैठकही आयोजन केले आहे. पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवताना उत्तर मुंबईतून विजय मिळवला. सातारमधून उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला. रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजपच्या कोट्यातील आहेत. त्यामुळे या जागांवर कुणाची वर्णी लागणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com