
थोडक्यात बातमीचा सारांश :
विधानभवनातील मारहाण प्रकरणात आरोपी असलेल्या ऋषी टकले याचे समर्थन आमदार सदाभाऊ खोत यांनी करून राजकीय खळबळ उडवली आहे.
गोपिचंद पडळकर यांच्यासाठी "जीव ओवाळून टाकणारे" कार्यकर्ते फक्त त्यांच्याकडेच असल्याचे विधानही खोत यांनी केले.
या विधानामुळे विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Sangli News : विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्य लॉबीमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. तर ही हाणामारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. यावेळी एकमेकांना जोरदार शिव्या देण्यात आल्या. यामुळे विधीमंडळ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. ज्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. तर आमदार माजलेत अशी टीका जनता करत होती. यानंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध केला होता. धक्कादायक बाबत म्हणजे विधानभवनात हाणामारी करणारा ऋषी ऊर्फ सर्जेराव बबन टकले हा सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समोर आले होते. दरम्यान आता या गुन्हेगाराचे गोड कौतुक भाजपचे आमदार करताना दिसत आहे. तेही एका भर कार्यक्रमात. यामुळे आता सांगलीत वेगळ्यातच चर्चा सुरू झाल्या आहेत. (Sadabhau Khot publicly supports Rishi Takale, accused in Maharashtra Assembly incident, calls him a loyal follower of Gopichand Padalkar)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटामध्ये भाजपकडून कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. तर इस्लामपुरचे ईश्वरपूर झाल्याचे त्यांना खटकले आहे. यामुळे त्यांच्या तळपायाची आग डोक्यात गेल्याची टीका केली होती.
याच मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी, सांगली जिल्ह्यात ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्याने विधानभवनात हाणामारी केली. शिवीगाळ करत विधीमंडळाला गालबोल लावले अशा ऋषी ऊर्फ सर्जेराव बबन टकले या सराईत गुन्हेगाराचे कौतुक केले. खोत यांनी, टकले याचे कौतुक करताना, दुष्काळी भागाचे नाव कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. पण नेत्यासाठी जीव ओवाळून टाकणारे टकले सारखे कार्यकर्ते हे फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत, असेही खोत यांनी म्हटले आहे.
यावेळी खोत यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कलियुगातील संजय म्हणत जोरदार निशाना साधला. राऊत यांनी मंत्रिमंडळातील 6 मंत्र्याची विकेट पडणार असे भाष्य केलं होते. यावर वक्तव्याचा खोत यांनी समाचार घेताना, कलियुगातील संजयला स्वप्न पडतात. ते म्हणत आहेत की मंत्रिमंडळातील 6 मंत्र्याची विकेट उडणार. पण हे सरकार भक्कम आहे. राऊत यांनी आता फक्त आकडेमोड करत मुलाखत द्यावी, असाही टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावलाय.
सतत पडणारे प्रश्न :
1. ऋषी टकले कोण आहे?
– ऋषी उर्फ सर्जेराव टकले हा विधानसभा परिसरातील मारहाण प्रकरणात आरोपी आहे.
2. सदाभाऊ खोत यांनी काय विधान केलं?
– त्यांनी ऋषी टकले याचे कौतुक करत, तो गोपीचंद पडळकर यांचा जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता असल्याचे म्हटले.
3. या विधानावर काय प्रतिक्रिया मिळाल्या?
– विरोधी पक्ष आणि जनतेतून संताप व्यक्त करण्यात आला असून, आरोपीचे खुले समर्थन योग्य नसल्याचे म्हटले जात आहे.
4. गोपीचंद पडळकर यांची यामध्ये काय भूमिका आहे?
– खोत यांच्या विधानानुसार, टकले हे पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, त्यांनी त्यांच्या नेत्यासाठी उग्र भूमिका घेतली.
5. या घटनेचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
– या विधानामुळे भाजप आणि पडळकर यांच्यावर राजकीय दबाव वाढू शकतो आणि आगामी निवडणुकीत विरोधक याचा वापर करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.