
Sangli News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. पडळकरांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच फोन लावला. मुख्यमंत्र्यांनीही पडळकरांचे कान टोचले. पण यानंतरही राष्ट्रवादीसह आघाडी आणि युतीच्या नेतेमंडळींकडून गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) टीकेची झोड उठवली जात आहे. पण याचदरम्यान, आमदार पडळकरांचे जिवलग मित्र असलेल्या विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत( यांनाही जयंत पाटलांवरची टीका चांगलीच खटकली आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी (ता.20) गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वादावर भाष्य केलं. ते म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं. आपली लढाई राजारामबापू यांच्याबरोबर नाही, तर त्यांच्या वारसांबरोबर असल्याचंही खोत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कधीच कोणत्याही भाजप नेत्याला अशा पद्धतीने बोलण्यास सांगितले नसल्याचंही आमदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं. पण याचवेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलेला त्रास सर्वांनाच माहित असल्याचंही बोलून दाखवलं.
सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर हे प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा नेता आहे, म्हणूनच त्यांना त्रास दिला जात आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर हे लंबी रेस का घोडा असल्याचा दावाही खोत यांनी यावेळी केला आहे.
तसेच जाती- पातीचे बी शोधण्याचे पेटंट शरद पवार यांच्याकडे जातं अशी टीकाही आमदार खोत यांनी यावेळी केली. तसेच त्यांनीच जाती- जातीमध्ये दरी निर्माण करण्याचं काम केलं, असा गंभीर आरोपही खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर केला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठली. पडळकर यांनी 'जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे',असं वक्तव्य केल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.