Sangali Politics : सांगलीत कोण निवडून येणार? शालिनीताई पाटलांच्या उत्तराने वातावरण बदलणार?

Vishwajeet Kadam Vs Chandrahar Patil : शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाविरोधात विश्वजित कदम, विशाल पाटलांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांची चर्चा केली. काही करून ही जागा आपल्याकडे घ्या, अशी गळ त्यांनी घातली होती.
Sagalitai Patil
Sagalitai PatilSarkarnama

Sangali Congress News : सांगलीची जागा राखण्यासाठी माजी मंत्री विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी अजूनही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सांगली ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याने ती इतर पक्षाला सोडू नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. असे असतानाही काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी सांगलीच्या निकालाबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या विधानाने सांगलीच्या राजकीय वातावरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. Crisis between Congress And Shivsena UBT Over Sangli Lok Sabha.

महाविकास आघाडीत सांगलीची जागा काँग्रेसकडे Congress येईल, अशी आशा होती. मात्र ऐनवेळी या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाविरोधात विश्वजित कदम, विशाल पाटलांनी VIshal Kadam दिल्लीत जाऊन वरिष्ठांची चर्चा केली. काही करून ही जागा आपल्याकडे घ्या, अशी गळ त्यांनी घातली होती. मात्र, आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही जागा ठाकरे गटाकडेच राहिली आहे.

आघाडीचे जागावाटप फायनल झाले असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीवरील दावा सोडला नाही. यातच शालिनीताई पाटलांनी Shalini Patil येथून कोण विजयी होणार, याची भविष्यवाणी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. ठाकरे गटाने येथून विचार करून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना Chandrahar Patil उमेदवारी दिली असेल. या उमेदवारीला काही तरी विचार करूनच काँग्रेसच्या वरिष्ठांनी सहमती दिली असेल. त्यामुळे येथून चंद्रहार पाटीलच विजयी होतील, असे थेटच शालिनीताई पाटील म्हणाल्या.

Sagalitai Patil
Eknath Shinde News : पुरंदरचा पुढचा किल्लेदार विजय शिवतारेच! अजितदादांसमोरच मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

दरम्यान, महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी मिळून सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. असे असतानाही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगलीच्या जागेबाबत अग्रही भूमिका कायम ठेवली आहे. तसेच चंद्रहार पाटलांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे कदम आणि विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sagalitai Patil
Madha Loksabha News : 'फडणवीसांनी आम्हांला खूप मदत केलीय,त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेंना...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com