Eknath Shinde News : पुरंदरचा पुढचा किल्लेदार विजय शिवतारेच! अजितदादांसमोरच मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

VIjay Shivtare Will be Next MLA : विजय शिवतारे खरे शिवसैनिक आहेत. त्यांनी एकदा ठरवले की तर ते ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. पुरंदरच्या लोकांसाठी त्यांची मोठी तळमळ आहे. माघार घेताना त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही.
Vijay Shivtare, Eknath Shinde, Ajit Pawar
Vijay Shivtare, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढवणार, अशी विजय शिवतारेंनी घेतलेली भूमिका महायुतीला तडा देणार होती. त्यांच्यामुळे राज्यभर बंड होण्याची शक्यता होती. मात्र विकासाचे राजकारण आणि नरेंद्र मोदींना Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला एक-एक जागा महत्त्वाची असल्याचे लक्षात आले. तालुक्यातील त्यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. मात्र पुरंदरचे पुढचे किल्लेदार हे विजय शिवतारे असतील, अशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या उपस्थित केली. Eknath Shinde Assured Vijay Shivtare For Assemly Election.

शिवतारेंनी अजित पवारांविरोधात Ajit Pawar घेतलेली भूमिकेवरून यू टर्न घेतल्यानंतर पुरंदरसह राज्यात विविध चर्चांना ऊत येण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी पुरंदरमध्ये येऊन संभाव्य चर्चा टाळण्यासाठी सभा घेण्याची गळ घातली होती. त्यानुसार गुरुवारी सासवड येथे महायुतीचा मेळावा पार पाडला. यावेळी शिवतारेंना अजित पवार विधानसभेचा शब्द देतील, अशी आशा पुरंदरवासियांना होती. मात्र तो शब्द अजित पवारांच्या उपस्थित मुख्यमंत्री शिंदेंनी दिला.

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले, विजय शिवतारे खरे शिवसैनिक आहेत. त्यांनी एकदा ठरवले की तर ते ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. पुरंदरच्या लोकांसाठी त्यांची मोठी तळमळ आहे. माघार घेताना त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही, मात्र लोकांच्या कामांची यादीच आमच्यापुढे ठेवली. अनेक कामे रखडलेली आहेत. ती पूर्ण केली जातील. आता पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारेच असतील, असे शिंदेंनी स्पष्ट केले. त्यावेळी उपस्थितांतून एकाने मंत्रिपदाचीही मागणी केली. त्यावर आधी आमदार तर होऊद्या, असेही शिंदे म्हणाले.

Vijay Shivtare, Eknath Shinde, Ajit Pawar
Vijay Shivtare News : शिवतारेंनी अजितदादांना दिला शब्द; 'बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असणार'

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवारांचे नाव निश्चित होताच माजी मंत्री विजय शिवतारेंनी VIjay Shivtare बंडाचा झेंडा उभारला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओपन चॅलेंज देऊन गत पराभवाचे उट्टं काढून बदला घेण्याची भाषा केली होती. शिवतारेंच्या आक्रमक भूमिका पाहता महायुतीतील नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे बोलले जात होते. मात्र वर्षा बंगल्यावर शिवतारेंची समजूत काढण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना यश आहे. त्यानंतर शिवतारेंनी अजित पवारांविरोधात उपसलेली तलवार म्यान केली. यावर अजित पवारांनी शिवतारेंचे शत्रुत्व पाहिले, अशी टिप्पणी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Vijay Shivtare, Eknath Shinde, Ajit Pawar
Baramati Loksabha : 'विजय शिवतारे मागे लागले की 'सळो की पळो' करतात'; अजित पवार नेमकं काय म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com