Maratha Reservation : नितेश राणेंना मराठा आंदोलकांनी अडवलं, गो बॅकच्या घोषणा

Maratha Reservation Nitesh Rane : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील टीका करत आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देण्याचे काम निलेश राणे करत आहेत.
Nitesh Narayan Opposition by Maratha agitators
Nitesh Narayan Opposition by Maratha agitatorssarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News: सकल हिंदू समाजाकडून इंदापूरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात भाजप आमदार निलेश राणे सहभागी होणार होते. मात्र, त्यांच्या सहभागाला स्थानिक मराठा तरुणांनी विरोध केला होता. विरोध असताना देखील आज (रविवारी ) नितेश राणे इंदापूरमधील सकल हिंदू समाजाच्या मोर्चात सहभागी झाले.

मोर्चात सहभागी होऊन काही अंतर चालत जात असतानाचा निलेश राणे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. नितेश राणे गोबॅक अशी जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी करत राणे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. घोषणा देणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी पकडले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील टीका करत आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देण्याचे काम निलेश राणे करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे दाढी ठेवलेले मोहम्मद जिना आहेत, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी जरांगे पाटलांवर केली होती.

Nitesh Narayan Opposition by Maratha agitators
Assembly Election Surve : राज्यातील पक्षांचे वेगवेगळे सर्व्हे काय सांगतात; कोणाला बसणार धक्का ?

जरांगे पाटलांवर राणेंनी केलेल्या टीकेनंतर मराठा समाजातून निलेश राणे यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात होती. आता नितेश राणेंना थेट मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

नारायण राणेंचे चॅलेंज

नितेश राणे यांच्या पाठोपाठ नारायण राणे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना विरोध केला होता. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असल्याचे नारायण राणे यांनी ठणकावले होते.

राणेंची मराठा आरक्षणाची भूमिका काय?

निलेश राणे, नारायण राणे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात मराठा आणि कुणबी वेगळे आहेत, अशी भूमिका मांडली होती. मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. मात्र, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली आहे.

Nitesh Narayan Opposition by Maratha agitators
Governoer Haribhau Bagde : `माझा तिहेरी सत्कार` हरिभाऊ बागडेंनी इच्छुकांना काढला चिमटा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com