Bjp Mla News : फडणवीसांचे नाव घेत आमदाराने 19 गावातल्या शेतकऱ्यांना दिली गॅरंटी!

Bjp Mla Samadhan Autade on Mhaisal Irrigation Scheme : शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजप आमदाराचे मोठे विधान...
Samadhan Autade, Devendra Fadnavis
Samadhan Autade, Devendra FadnavisSarkarnama

Mangalwedha Solapur News :

म्हैसाळ योजनेच्या मूळ आराखड्यामध्ये शिरनांदगी, मारोळी, लवंगी या तलावाचा समावेश नाही. त्यामुळे या तलावाचा समावेश करून या भागाला पाणी कमी पडणार याची काळजी घेऊ आणि जर पाणी कमी पडत असेल तर ते वाढवून कसे घेता येईल याकडे लक्ष देऊन तुम्ही फक्त सुचवत रहावा. मी जलसंपदा मंत्री Devendra Fadnavis यांच्या माध्यमातून पाण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही भाजप आमदार समाधान अवताडे यांनी दिली.

तालुक्याच्या दक्षिण भागातील म्हैसाळ योजनेतील 19 गावातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भातील बैठक सलगर बुद्रुक येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपकार्यकारी स्वप्नील गोसावी, अजिंक्य जाधव, शाखा अभियंता महेश पाटील यांच्यासह BJP चे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, जि. प.चे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, आंबादास कुलकर्णी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Samadhan Autade, Devendra Fadnavis
Loksabha Election : माढ्यात भाजपविरोधात अजित पवार गट आखाड्यात; महायुतीची 'ऐशी की तैशी'

आतापर्यंत अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या. आता आमची पिढीही चालली आहे. दुष्काळात जन्मलो. दुष्काळात मरणार नाही, भिष्मप्रतिज्ञा घेऊन मी काम करतोय. अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून मला जेवढा निधी खेचून आणता येईल त्यापेक्षा अधिकचा निधी खेचून आणला. मात्र आपल्या भागाचा बॅकलॉग मोठा असल्यामुळे पाणी, रस्ते, वीज यासाठी अधिकचा निधी मिळण्याची प्रयत्न माझे सुरू आहेत, असे समाधान आवताडे म्हणाले.

ज्या योजनेचे पाणी तालुक्याला कधीच प्रस्तावित नव्हते त्या टेंभू योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्याला आणून दाखवण्याचे काम मी केले. उमदी परीसरात पाणी सहजरित्या उपलब्ध होते. मात्र शेवटच्या टोकाला असलेल्या आमच्या भागात पाणी उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे योग्य नियोजन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरनांदगीचे गुलाब थोरबोले यांनी म्हैसाळ योजनेच्या वितरिकेतून तलावात स्वतंत्र लाईनने पाणी सोडण्याची, ओढ्यावरील बंधारे भरून देण्याची मागणी केली. येळगीचे सचिन चव्हाण व सोड्डी शांताप्पा बिराजदार यांनी शेवटच्या टोकावर असलेल्या गावाला पाणी मिळत नाही. पाणी पोहोचवण्याची मागणी केली. (Solapur Politics )

यावर आमदार समाधान आवताडे यांनी लवंगी, पडोळकरवाडी, शिरनांदगी या तलावात मुख्य वितरिकेतून मोठ्या पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठवला असून लवकर त्याला मंजुरी मिळणार असल्याची सांगून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी संपादित झाल्या त्यामधील तीन गावाचे पैसे प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत तर उर्वरित गावाच्या भूसंपादनासाठीचा निधी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिल्या.

Samadhan Autade, Devendra Fadnavis
Ujani-Solapur Pipeline : ‘उजनी-सोलापूर पाईपलाईनसाठी 350 कोटी; अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com