संभाजीराजेंच्या जिवाला धोका... Z+ सुरक्षेची मागणी...

Sambhajiraje : चित्रपट सृष्टीवर माफिया,अंडरवर्ल्डमधील कुख्यात मंडळींचा वरचष्मा आहे.
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi newsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : संभाजीराजे छत्रपती यांनी 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यानंतर चित्रपटांना विरोध वाढताना दिसत राज्यातील काही ठिकाणी चित्रपटाचे शो देखील बंद पाडण्यात आले आहे. यामुळे वातावरणं चांगलचं तापलं आहे.

दरम्यान, यावरून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या जिवाला धोका होवू शकतो यामुळे त्यांना Y+ ऐवजी Z+ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news)

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
खराब रस्त्यांबद्दल नितीन गडकरींनी मागितली जाहीर सभेत माफी...

दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना इतिहासाची तोडफोड केली जात असल्याचा आरोप करत इतिहासाची तोडफोड करून चित्रपट काढाल, तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे, असा दम दिला होता.

ते म्हणाले होते की, अशा चित्रपटांच्या विरोधात मी उभा राहिल. मी छत्रपती घराण्यात जन्माला आलोय, हे अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराचं त्यांनी दिला होता. यानंतर स्वराज्य संघटना, छावा क्रांतिवीर सेना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय छावा संघटना, छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र भुमिका घेत संभाजीराजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे.

या संघटनांनी या मागणीसाठी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले की, गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील इतिहासावर आधारित प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या चित्रपटाविषयी महाराष्ट्र समाजात तीव्र असंतोष आहे. दस्तूरखुद्द छत्रपतींचे वारस संभाजी राजें यांनीही या चित्रपटाच्या निर्मितीवर आक्षेप घेऊन चित्रपट निर्मात्यांना इशारा दिला आहे. हे आपण जाणताच.

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
..म्हणून आम्ही संभाजीराजे अन्‌ उदयनराजे यांचे आभार मानले : ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकांनी मांडली भूमिका!

आपण हेही जाणता की,चित्रपट सृष्टीवर माफिया,अंडरवर्ल्डमधील कुख्यात मंडळींचा वरचष्मा आहे. त्यांच्या अजेंड्याला विरोध करणाऱ्या मंडळीविरुद्ध प्राणघातक कट रचून अंमलातही आणले जातात. हा इतिहास नजरेसमोर असल्याने छत्रपततींच्या पराक्रमी इतिहासाचे विडंबन करण्यास विरोध करणारे संभाजी राजें यांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे आम्हा तमाम मावळ्यांचा संशय आहे.

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्री-आमदारांवरील कंट्रोल सुटतोय?; 'या' वक्तव्यावरून झाली आतापर्यंत गोची...

सबब छत्रपतींना सध्या असलेले y+ दर्जाचे संरक्षण ऐवजी z+ संरक्षण देण्यास आमची आग्रहाची विनंती आहे.

दुर्दैवाने कुणा दुष्ट शक्तीने छत्रपती संभाजी राजेंकडे वक्र दृष्टीने पाहिले तरी त्याचे दुष्परिणाम काय होतील हेही आपण जाणताच. सबब आपण महाराष्ट्र समाजाची विनंती मान्य करून छत्रपतींच्या संरक्षणात वाढ करावी ही पुन्हा एकदा विनंती,अशा शब्दात त्यांनी आपली मागणी केली आहे. आता त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com