Buldhana Bus Accident News : 'समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा, अपघात रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत'; थोरातांची मागणी!

Buldana Samruddhi Mahamarg Accident Burning Bus : "वेग मर्यादा सह सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने त्वरित कार्यवाही करावी.."
Buldhana Bus Accident News :  Balasaheb Thorath
Buldhana Bus Accident News : Balasaheb ThorathSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Samrudhhi Mahamarg Accident : रात्री उशिरा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बस उलटून पेट घेतल्यानंतर झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा अत्यंत दुःखद मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून, सरकारने अपघात रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहनही केले आहे. (Buldana Samruddhi Mahamarg Accident)

Buldhana Bus Accident News :  Balasaheb Thorath
Samrudhhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत..

"समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा जवळ बस एका खांबाला धडकून उलटली व यानंतर या बसने पेट घेतला. यामध्ये 25 प्रवाशांचा दुःखद मृत्यू झाला आहे ही संपूर्ण महाराष्ट्राची साठी अत्यंत दुःखदायक आहे. या अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी ईश्वराकडे प्रार्थना करताना त्यांनी समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून यावर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे," अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

"मागील काही दिवसांमध्ये अनेक अपघात या रस्त्यावर झाले असून वेग मर्यादा सह सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने त्वरित कार्यवाही करावी तसेच सर्व वाहन चालकांनीही वेग मर्यादा पाळावी," असे आवाहन करताना या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व प्रवाशांना थोरात यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Buldhana Bus Accident News :  Balasaheb Thorath
Buldana Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वर धावत्या बसचे टायर निघाले, द बर्निंग बसचा थरार, २५ जणांचा कोळसा !

आमदार सत्यजित तांबे यांच्याकडूनही श्रद्धांजली -

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी बसचा झालेला भीषण अपघात मन सुन्न करणारा आहे. या अपघातात तब्बल 25 प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. मागील काही दिवसांमध्ये अनेक अपघात या रस्त्यावर झाले असून, अपघात रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावली उचलावीत. या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. व जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना," असे सत्यजित तांबे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com