Vidarbha Travels met with a terrible accident on Samridha Highway : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २९ बी ई १८१९ ही नागपूर वरुन पुणे जात होती. (Bus MH 29 BE 1819 was going to Pune from Nagpur)
काल (ता. ३० जून) रोजी नागपूरवरून सायंकाळी पाच वाजता पुणेसाठी ही बस निघाली होती.१ जुलैच्या रात्री एक वाजून २२ मिनिटांनी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटली.
उलटल्यानंतर बसने काही मिनिटांतच पेट घेतला. त्यानंतर स्फोट होऊन संपूर्ण बस पूर्णपणे जळून त्यामध्ये २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला (Pune) जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडच्या वाहनाने बस विझवण्यात आली. बसमधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने तातडीने सुरू केले.
काचा फोडून काही प्रवासी बाहेर निघाले..
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसने उलटून अचानक पेट घेतल्यामुळे बसमधील काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येत जीव वाचवला. त्यामध्ये चार ते पाच प्रवाशांसह ट्रॅव्हलचालक व वाहक सुखरूप बचावले आहेत.
मृतांमध्ये कॉलेजच्या मुली व लहान मुलांचासुद्धा समावेश आहे. विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि लहान मुलांचासुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ट्रॅव्हल्समधील बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे. जिल्हाधिकारी (Collector) व पोलिस अधीक्षक पहाटे ५.३० वाजता घटनास्थळावर पोहोचले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.