Gram panchayat result updates: परिचारक गटाच्या शिवानंद पाटलांनी गाव राखले; मंगळवेढ्यात समविचारीचा बोलबाला

तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मात्र, विविध पक्षाकडून दावा करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या संख्या २५ वर गेली आहे
Mangalvedha Gram Panchayat election
Mangalvedha Gram Panchayat election Sarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची आणि लक्षवेधक ठरलेल्या तळसंगी ग्रामपंचायत (Gram Panchyat) निवडणुकीत संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे (Damaji Sugar Factory) अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या गटाचे वर्चस्व कायम राखले आहे. सरपंचपदाच्या उमेदवार, पाटील यांच्या सूनबाई पूजा पाटील या २६८ मतांनी विजयी झाल्या आहेत. (Samvichari Aghadi dominated Gram Panchayat elections in Mangalvedha)

मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज शासकीय गोदामात तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. पहिल्या फेरीमध्ये येड्राव, गोणेवाडी, तळसंगी, शिरनांदगी, पाटकळ, गुंजेगाव, खोमनाळ, मारापूर, डोंगरगाव, सोड्डी, पौट, ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली, तर दुसऱ्या फेरीत ढवळस, बावची, भालेवाडी, मारोळी, राजापूर या ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली.

Mangalvedha Gram Panchayat election
Gram panchayat election result : गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांना धक्का; मुलीचा विजय मात्र संपूर्ण पॅनेलचा धक्कादायक पराभव

खोमनाळ येथे कल्पना पवार आणि अश्विनी सुळकुंडे या महिलांना समान मतदान (227) पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयात कल्पना पवार या विजयी झाल्या. तशाच प्रकार गुंजेगाव येथे झाला. राहुल खांडेकर व पांडुरंग ढोणे यांना समान मतदान (311) पडली. चिठ्ठीद्वारे राहुल खांडेकर यांना विजयी घोषित करण्यात आले.

Mangalvedha Gram Panchayat election
मोठी बातमी : बालेकिल्ल्यातच फडणवीसांना झटका; दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीची सत्ता

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून मंगळेवढा तालुक्यामध्ये भालके व परिचारक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती होत समविचारी गटाची स्थापना करण्यात आली. तोच पॅटर्न या ग्रामपंचायत निवडणुकीतही कायम राहिला. काही ठिकाणी आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने भारत भालके गटाबरोबर युती केली, तर भालके गट काही ठिकाणी परिचारक गटाबरोबर एकत्र आला होता. मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या गटाबरोबर गावगाड्यातील सत्तेसाठी नवा समविचार या निवडणुकीच्या निमित्ताने रुजवण्यात आला.

Mangalvedha Gram Panchayat election
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व; सात ग्रामपंचायती जिंकल्या

निकालानंतर सर्वच गटांनी तालुक्यातील सर्वच नेत्याच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याकडून सत्कार स्वीकारत आम्ही तुमचेच आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय भालेवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य शीला शिवशरण यांनी समविचारी गटाच्या मदतीने सत्ता मिळविली आहे. येड्राव येथे माजी सभापती उपसभापती काशिनाथ पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. संजय पाटील सरपंचपदी विजयी झाले.

Mangalvedha Gram Panchayat election
भोरमध्ये काँग्रेसच्या संग्राम थोपटे गटाचा बोलबाला : १३ ग्रामपंचायींत विजय; राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

गोणेवाडी येथे राष्ट्रवादीचे रामेश्वर मासाळ यांचे वर्चस्व राहिले. बावची येथे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाला सत्ता गमवावी लागली, त्या ठिकाणी भालके-परिचारक पुरस्कृत पॅनेलचे सर्व सदस्य विजयी झाले. मारोळी येथे दामाजीचे संचालक बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व सदस्य मोठ्या फरकाने निवडून आले आहेत, राजकुमार पाटील हे सरपंचपदासाठी तालुक्यात ५५६ मतांनी विजयी झाले आहेत. सोड्डीत यादप्पा माळी गटाचे पाच सदस्य विजयी झाले. मात्र, सरपंचपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. आमदार समाधान आवताडे यांच्या गटाचे शांतप्पा बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गटाने सत्ता मिळवली.

Mangalvedha Gram Panchayat election
Gram Panchayat Election : पंढरपुरात ११ पैकी ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; पुळूजवाडीत महाडिकांना धक्का, परिचारकांची बाजी

पाटकळ येथे सरपंचपदासाठी आठ जण आखाड्यात होते. भालके व सिद्धेश्वर अवताडे यांच्या गटाने सत्ता ऋतुराज बिले हे सरपंचपदी विराजमान झाले. या ठिकाणी दामाजीचे संचालक महादेव लुगडे यांच्या गटाचा पराभव झाला. मारापूर येथे आमदार अवताडे समर्थक विनायक यादव विजयी झाले. दामाजीचे संचालक टी. बी. पाटील यांच्या गटाचा पराभव झाला. शिरनांदगी येथे मायाका थोरबोले या यांना दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा मान मिळाला. डोंगरगाव येथे झालेल्या पंचरंगी लढतीत सारिका खिलारे या विजयी झाल्या. हाजापूर येथे पाच सदस्य यापूर्वी बिनविरोध झाले होते. दोन सदस्य व सरपंचपदाच्या निवडीत माधवानंद आकळे यांच्या नेतृत्वाखाली मैना देवकुळे या विजयी झाल्या. ढवळस येथे समविचारी गटाच्या रोहिणी हेंबाडे विजयी झाल्या. गुंजेगाव येथे आवताडे भालके युतीतून विमल चौगुले, तर खोमनाळ येथे बायडाबाई मदने विजयी झाल्या.

आमदार आवताडे गटाने १० ग्रामपंचायतींवर, तर भालके गट व परिचारक गटाच्या समविचारी गटाने ११, तर सिद्धेश्वर आवताडे गटाने चार ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मात्र, विविध पक्षाकडून दावा करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या संख्या २५ वर गेली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com