Mangalveda News : मंगळवेढ्याचा समविचारी गट भाजपत जाणार की प्रशांत परिचारकांनाच राष्ट्रवादीत आणणार?

पंढरपूरमधील सहकारी संस्थांवर परिचारकांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Prashant Paricharak
Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) अर्बन बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्या विजयानंतर परिचारकांच्या सत्काराला रांग लागली असतानाच मंगळवेढा (Mangalveda) येथील समविचारी गटही पंढरपुरात पोचला. समविचारी गट व परिचारक यांच्यातील वाढता सलोखा लक्षात घेता हा गट भाजपत (BJP) विलीन होणार की परिचारकांना राष्ट्रवादीत (NCP) आणणार, याची चर्चा मंगळवेढ्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली. (Samvichari group of Mangalveda join BJP or bring Prashant Paricharak to the NCP?)

पंढरपूरमधील सहकारी संस्थांवर परिचारकांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक गट खंबीरपणे पाठीशी राहिल्यामुळे समाधान आवताडे यांचा विधानसभेचा मार्ग सुकर झाला होता. पोटनिवडणुकीनंतरच्या काळात मात्र परिचारक समर्थकाने सवतासुभा घेतला. त्याची प्रचिती मंगळवेढ्यातील अनेक कार्यक्रमांतून आली.

Prashant Paricharak
Sanjay Shirsat's Son News :ऑफिसला परत आला तर तुझे हातपायच तोडतो, बेट्या... : आमदार शिरसाठांच्या मुलाची केटरिंग व्यावसायिकास धमकी

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक गटाने शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी गटाची मोट बांधून दामाजी कारखान्यावर ताबा मिळवला. पंढरपुरातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दामाजी कारखान्याचा कारभार सुरळीत चालू असल्याने समविचारी गटाबद्दलची विश्वासार्हता वाढली असतानाच इतर निवडणुकांतही हाच टेंपो पुढे कायम राहिला आहे.

Prashant Paricharak
AjitDada Warned Gogawale : ‘गोगावले, तुम्ही मला जेवढी अडचण निर्माण कराल, तेवढे मंत्रीपद तुमच्यापासून दूर जाईल’

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील १८ पैकी ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा करणारे डिजिटल फलकही मंगळवेढ्यात लावण्यात आले होते, त्यामुळे एकंदरीत तालुक्याच्या राजकारणामध्ये समविचारी गटाचा प्रभाव वाढू लागला. भविष्यात पक्षीय चिन्हावर होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता एक तर ह्या समविचारी गटातील नेत्यांना कोणत्यातरी पक्षाचा झेंडा घ्यावा लागेल, त्यामुळे हे भाजपत जाणार की राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार याकडे लक्ष असणार आहे. समविचारी गटाने सुरू केलेली बांधणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम राहिली, तर तालुक्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरू शकते.

Prashant Paricharak
Eknath Shinde News: त्यावेळी ‘वर्षा’वर पाटीभर लिंबं सापडली होती : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

माजी आमदार प्रशांत परिचारकांच्या सत्कारासाठी मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात, अजित जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी. बी. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, काँग्रेसचे सुरेश कोळेकर, नगरसेवक प्रवीण खवतोडे, रामकृष्ण नागणे, युन्नुस शेख, भारत बेदरे, बबलू ,सुतार रावसाहेब फटे, रामेश्वर मासाळ, संचालक बसवराज पाटील, औदुंबर वाडदेकर तानाजी कांबळे दिगंबर भाकरे,गोपाळ भगरे राजेंद्र पाटील,तानाजी काकडे, ज्ञानेश्वर भगरे महादेव लुगडे आदींनी पंढरपुरात हजेरी लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com