मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भाषणाला उत्तर देताना आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर चिडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘गोगावले, तुम्हाला कितीदा सांगितलं. मी बोलत असताना माझ्यामध्ये व्यतव्य आणत जाऊ नका. तुम्ही मला जेवढी अडचण निर्माण कराल, तेवढं मंत्रीपद तुमच्यापासून दूर जाईल,’ असा कडक शब्दांत इशाराच देऊन टाकला. (Ajit Pawar warned again Bharat Gogawale)
विरोधी पक्षनेते पवार यांनी सलग तिसऱ्या दिवशी भरत गोगावले यांना टार्गेट केले. पहिल्या दिवशी मंत्रीपदावरून निशाणा साधला होता. गोगावले यांच्या शपथविधीसाठी मी जगात कोठेही असलो तरी येईन, असे म्हटले होते. त्यानंतर काल ते मंत्रीपद एकदाची भरून टाका, ते गोगावले माझ्याकडून पाहून मिशाला पिळ देत असतात आणि दाढी कुरवळतात.’ त्यानंतर आज थेट इशाराच दिला.
अजित पवार म्हणाले की, देशात पंतप्रधान एक नंबरचं, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद दोन नंबरचं पद मानलं जातं. आपल्या राज्यात कधीही वन साईट कुठलीही गोष्ट होत नाही. राज्यातील जनता बॅलन्स ठेवण्याचे काम करत आलेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आपण जपली आहे. ती वाढवली पाहिजे. त्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर आहे.
मागं काय झालं, कसं झालं ते आता काढत जाऊ नका. मी तुम्हाला खरोखर सांगतो. तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. टीकेला उत्तर देत बसू नका. त्यातून तुमचा मोठेपणा बघायला मिळेल. बोलणारे बोलत असतात. आपण आपलं काम करत राहायचं. कोण योग्य बोलतं आणि कोण अयोग्य बोलतं, हे जनता व्यवस्थित समजून घेत असते, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर बोलत असताना एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले मध्येच बोलले. त्यावर अजित पवार चिडून म्हणाले की, ‘गोगावले, तुम्हाला कितीदा सांगितलं. मी बोलत असताना माझ्यामध्ये व्यतव्य आणत जाऊ नका. तुम्ही मला जेवढी अडचण निर्माण कराल, तेवढं मंत्रीपद तुमच्यापासून दूर जाईल. तुम्हाला माहित नाहीत, माझे आणि एकनाथरावांचे काय संबंध आहेत. काय तुम्हाला कळतं कसं नाही. तुम्ही आमदार आहात, जरा समजून घ्या हो.’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.