Sangali Politics : तासगाव बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपसमोर तिसरी आघाडी उभी होणार?

Market Committee Election : बिनविरोध निवडणुका होण्याची परंपरा खंडीत होणार?
Market Committee Election
Market Committee Election Sarkarnama
Published on
Updated on

Tasgaon News : सांगलीतील तासगावच्या आगामी बाजार समिती निवडणुकीच्या दृष्टीने आता ट्विस्ट आले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार संजयकाका पाटील (SanjayKaka Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील (Suman Patil) यांच्यात तासगाव बाजार समितीची लढत असताना, यामध्ये तिसरी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे माहिती समोर येत आहे .

तिसरी आघाडीची मोर्चाबांधणी करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची वेगळी बैठक पार पडली असल्याची चर्चा होत आहेत. तिसरी आघाडी तयार झाल्यास, बाजार समितीच्या निवडणुकीला वेगळे वळण येणार आहे.

Market Committee Election
Rajaram Sugar Factory : 'कुस्ती मर्दासारखी लढा, रडीचा डाव खेळू नका'; सतेज पाटील - महाडिक संघर्ष पेटला!

आगामी काळात तासगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही प्रस्तावित आहेत. या निवडणुकीत बाजार समिती निवडणुका निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने खासदार संजयकाका पाटील, प्रभाकर पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी जोरदार तयारी केलेली आहे. मात्र अजूनही या निवडणुकीचा चित्र स्पष्ट होत नाही.

यापूर्वी तासगाव बाजार समितीत बिनविरोध होण्याची परंपरा होती. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून, नेहमीच या निवडणुका बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घेता, यंदाची निवडणूक होण्याची अपेक्षा होती. मात्र आता या निवडणुका बिनविरोध होण्याच्या शक्यता मावळल्या असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेत खंड पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Market Committee Election
SIT Inquiry : सांगली, चंद्रपूरसह चार बॅंकांतील गैरव्यवहारची एसआयटीमार्फत चौकशी : सहकारमंत्र्यांची विधान सभेत घोषणा

भाजप-राष्ट्रवादीचे नेत्यांनी घेतला धसका :

तालुक्यातील सावर्डे या गावात तालुक्यातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याची माहिती आहे. तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या धसक्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धसका घेतला आहे. याबाबत आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र तिसरी आघाडी निर्माण होणार का? ही तिसरी आघाडी निर्माण झाली तर यात कोण कोण नेत सामील होणार? तिसरी आघाडी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला सक्षम पर्याय देण्यात यशस्वी होईल का? याची उत्सुकता तासगाव तालुक्यात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com