Sangli Political News : सांगलीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. उद्धव ठाकरेंनी सांगली आपल्याकडेच असणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर विश्वजित कदमदेखील मागे हटण्यास तयार नाहीत. सांगलीवर काँग्रेसचा Congress दावा कायम असल्याचे ते सांगत आहेत. आता हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने सांगलीवरील दावा ठाकरे गटाने सोडायला हवा, असा अप्रत्यक्ष सल्लाच विश्वजित कदम यांनी दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला Shiv sena एक जागा हवी होती. त्यासाठी ते सांगली मागत होते. सत्यजित पाटील यांना त्यांनी हातकणंगलेमधून उमेदवारी दिली आहे. आता तिथे ‘मशाल’ चिन्ह आले आहे. मग सांगलीचा हट्ट कशासाठी, असा सवाल विश्वजित कदम Vishwajeet Kadam यांनी केला आहे.
कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्याने सांगलीची जागा आम्हाला मिळाली, असा दावा संजय राऊत Sanjay Raut यांनी केला होता. तो दावादेखील कदम यांनी खोडून काढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली या विषयाला लॉजिक नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली देणार, असे काही ठरले नव्हते, असे विश्वजित कदम यांनी ठासून सांगितले.
कोल्हापूरच्या जागेबाबत छत्रपती शाहू महाराजांचे नाव चर्चेला आले. शाहू महाराजांची प्रतिमा चांगली आहे. त्यांच्याबद्दल समाज मनात खूप आदराचे स्थान आहे. ते जो पक्ष निवडतील त्याचा सन्मान ठेवावा, असे ठरले होते. त्यानुसार त्यांनी काँग्रेस निवडला. कोल्हापूर पुरोगामी जिल्हा आहे, म्हणून त्यांनी तसा विचार केला. ती जागा काँग्रेसला गेली. त्यावेळी कुठेही आदलाबदलाची चर्चा झाली नव्हती, असेदेखील विश्वजित कदम म्हणाले.
हेदेखील वाचा-
सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद आहे. नेटवर्क आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद तो त्यांनी लढावे, असे अपेक्षित होते. त्यामुळे सांगलीवर आमचा दावा कायम आहे. सांगलीतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, जनतेसाठी मी कठोर भूमिका घेतली आहे, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.
सांगलीबाबत काय राजकारण सुरू आहे याची मला माहिती नाही. मला भाजपची ऑफर असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. त्यात मला पडायचे नाही. मात्र, सांगलीबाबत शेवटपर्यंत आग्रही राहणार आहे. त्यानंतर आमचे राज्यातील, दिल्लीतील नेते ठरवतील, महाविकास आघाडीचे जे ठरेल, त्यानुसार काम करणार, असा दावा विश्वजित कदम यांनी केला.
(Edited By Roshan More)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.