Loksabha Election 2024 : आदित्य ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं; रांगेत उभे राहूनही त्यांना तिकीट मिळेना....

Aditya Thackeray आदित्य ठाकरे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजप, शिंदे गट शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.
Bhavna Gawali, Aditya Thackeray
Bhavna Gawali, Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगर येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भावना गवळींवर टीका केली आहे. ज्यांना शिवसेनेने व उद्धव ठाकरेसाहेबांनी पाच वेळा खासदार बनवलं. त्यांना आता दहा तास रांगेत उभे राहूनदेखील तिकीट मिळालं नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजप, शिंदे गट शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. तसेच खासदार भावना गवळींनाही त्यांनी डिवचलं. आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना अनेक वेळा शिवसेनेने व उद्धव ठाकरेसाहेबांनी खासदार बनवलं. त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की, त्यांना पाच वेळा खासदार बनवलं.

आता त्यांना दहा तास रांगेत उभे राहूनसुद्धा तिकीट मिळालं नाही. अजून दोन-तीनच नाही अशी अनेकजण आहेत.ज्यांची तिकिटे कापली गेलेली आहेत. जी गद्दारी करायची होती, उद्धव ठाकरे Udhav Thackeray साहेबांसोबत पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा होता. तो त्यांनी खुपसलाच आहे आणि महाराष्ट्रासोबत बेईमानी केली आहे.

Bhavna Gawali, Aditya Thackeray
Chhatrapati Sambhajinagar News : ठाकरे गटातील नाराजी नाट्य थांबेना, दानवे-खैरेंचे सूर जुळले असतानाच आता...

आदित्य ठाकरे म्हणाले, एक जरी उमेदवार पडला तर राजीनामा देईन असे त्यांनी सांगितलं होतं. त्यांनाही ते तिकीट देऊ शकत नाहीत, असे हाल त्यांचे सध्या सुरू आहेत. त्यांच्याकडे जे चाळीस गद्दार आहेत, त्यांनीसुद्धा आता विधानसभेबाबत विचार करावा की आपलं काय होईल. कारण, आता हे चित्र दिसू लागलं आहे की, विकेट कशा पडायला सुरुवात झाली आहे, असे त्यांनी नमूद केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, मिंदे गट आणि भाजप यांना उमेदवार मिळत नाहीत. भाजपने दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत, तेही मुंबईविरोधी आणि महाराष्ट्रविरोधी असल्याची सडेतोड टीकाही आदित्य ठाकरेंनी महायुतीवर केली.

Edited By : Umesh Bambare

R

Bhavna Gawali, Aditya Thackeray
Aditya Thackeray Tweet on Kejriwal Arrest : 'स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाहीत आहोत का?' केजरीवालांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंचा घणाघात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com