Tejas Thackeray राजकारणात येणार? आता आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Tejas Thackeray| Aditya Thackeray| शिवसेनेतील हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता ही सेनेने नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
Tejas Thackeray| Aditya Thackeray|
Tejas Thackeray| Aditya Thackeray|
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. तेव्हापासून सेनेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठींबा वाढत आहे. शिवसेनेतील हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता ही सेनेने नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) स्वतः राज्याचा दौरा करत आहेत. अशात आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे देखील राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी तेजस ठाकरे राजकारणात येणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याला यायचे असेल तर तो सांगेन. कोणीतरी अफवा पसरवतं तीच पुढे नेली जाते. हे चुकीचं आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या उत्तरामुळे तूर्तास तरी तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Tejas Thackeray| Aditya Thackeray|
बंडानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत शिंदे गटाची चमकदार कामगिरी....

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदार केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठींबा वाढत आहे. अशातच मुंबई महापालिकेची निवडणूक आणि राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचविण्याचा मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.

तसेच तेजसचा स्वभाव हा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांसारखा असल्याचे स्वतः बाळासाहेबांनी एका भाषणात म्हटले होते. शिवसेनेच्या बंडखोरांचे आव्हान थोपविण्यासाठी व सेनेला नवी उभारी देण्यासाठी तेजस ठाकरेंचे सक्रिय होणे महत्वाचे मानले जात आहे. एकीकडे आदित्य ठाकरे राज्याच्या विविध भागांचे दौरे करत आहेत.

यापूर्वी अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, तसे घडले नाही, काही मोजक्या राजकिय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूरच असल्यचे दिसून आले होते. मात्र, आता शिवसेनेची मातब्बर नेते मंडळी सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करून शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com