Vishwajit Kadam: 'सांगली'वर काँग्रेसचा दावा; पटोले, थोरातांवर दबावतंत्र, विश्‍वजित कदमांनी मुंबईत तळ ठोकला...

Sangli Lok Sabha Constituency 2024: सांगलीत विजयाची खात्री असताना ही जागा ठाकरे गटाला का द्यावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News: महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency 2024) शिवसेना (ठाकरे) पक्षाला देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत दबावतंत्राचा वापर केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) , विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची आमदार विश्‍वजित कदम (Vishwajit Kadam) , प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट घेतली. सांगलीत विजयाची खात्री असताना ही जागा ठाकरे गटाला का द्यावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सांगली लोकसभेच्या जागेबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे, याबाबत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मुंबईत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. आमदार विश्‍वजित कदम सध्या तिथेच तळ ठोकून आहेत. त्यांनी सांगली मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे.

गरज लागली तर खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटून हा विषय मार्गी लावू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसला सध्या अत्यंत चांगले वातावरण असताना उलटसुलट बातम्यांनी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. हा संभ्रम चांगला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आम्ही एकजुटीने लढा उभा केला आहे. वातावरण पुन्हा काँग्रेसमय होत असताना पक्षाकडून जागा जाणे दीर्घकाळ नुकसान करणारे ठरेल’, याची जाणीव त्यांनी करून दिली. आमदार विश्‍वजित कदम यांनी अधिक आग्रही भूमिका मांडली.

त्यावर थोरात यांनी ‘कोल्हापूरच्या बदल्यात सांगली’ हा विषयच महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही, तुम्ही चिंता करू नका. शिवसेनेला पर्यायी जागा सुचवल्या जातील. मात्र, सांगली आपण सोडणार नाही. सांगलीतून विशाल तुम्हीच लढणार आहात. सांगलीला परत जा आणि तयारीला लागा’, असे सांगितले.

 Vishwajeet Kadam
Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंचा ताफा मध्यरात्री पोचला दवाखान्यात...

‘काँग्रेस सांगली पुन्हा जिंकणार हे स्पष्ट असताना ही जागा सोडण्याची चर्चादेखील होता कामा नये’, अशी आग्रही भूमिका नेत्यांनी मांडली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील सांगलीची जागा देणार नाही, ’ असा शब्द दिल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार आहे, त्यामध्ये सांगलीच्या जागेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात लढणार

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे, तुम्ही कामाला लागा, असा स्पष्ट निरोप आम्हाला मिळाला आहे. सध्या काही बातम्या पेरल्या जात आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याने संभ्रमित होऊ नये. सांगली काँग्रेसच लढेल. आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वात आम्ही ताकदीने लढू, असे काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com