Sangli Lok Sabha Counting : सांगलीला अडीच हजार पोलिसांचा पहारा; कोणत्या पाटलांचा गुलाल उधळणार याचा फैसला होणार तीन वाजता

Maharashtra Lok Sabha election 2024 : दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या धक्कादायक अंदाजामुळे या मतदारसंघातील विद्यमान खासदार संजयकाका पाटील, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह अन्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत..
Maharashtra Police
Maharashtra PoliceSarkarnama

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी आठ वाजता होत आहे. 14 टेबलवर मतमोजणी होणार असून सरासरी 21 फेर्‍या होतील. मतमोजणीला अवघे काही तास उरल्याने राजकीय पक्षांची घालमेल झाली आहे. मंगळवारी दुपारपर्यंत निकाल घोषित होईल, यासाठीही प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी तीनपर्यंत या मतदारसंघातून कोण गुलाल उधळणार हे निश्चित होणार आहे.

या मतमोजणीसाठी सुमारे 700 जिल्हा प्रशासनातील कर्मचारी आणि सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे.मतमोजणी केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे, याशिवाय जिल्ह्यातील संवेदनशील गावात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह 20 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तरी खरी लढत ही भाजपचे (BJP) विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर,अपक्ष उमेदवार विशाल पाटील या दोन उमेदवारातच झाली, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला आहे.परंतू महाविकास आघाडीतील फुटीमुळे ठाकरे गटाची निवडणुकीत कोंडी झाल्याचे दिसून आले.

लोकसभा मतदारसंघातील 18 लाख 68 हजार 174 मतदारांपैकी 11 लाख 63 हजार 353 मतदारांनी मतदान केले. 9 लाख 53 हजार 24 पुरुष मतदारापैकी 6 लाख 22 हजार 54 जणांनी मतदानाचा हक्क बजावला तर 9 लाख 15 हजार 26 महिला मतदारापैकी 5 लाख 41 हजार 267 महिलांनी मतदान केले. 62.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मतदानानंतर ईव्हीएम मशीन मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसमधील गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी खडा पहारा आहे.

Maharashtra Police
Vishal Patil : "माझ्या विमानाची दिशा पायलटनं ठरवली, मावळत्या खासदारांना अहंकार जास्त," विशाल पाटील कडाडले

मतदान झाल्यानंतर तब्बल 26 दिवसांनंतर मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतमोजणीसाठी किती टेबल राहणार, किती आणि कर्मचारी असणार याचे पूर्ण नियोजन झालेले आहे, तर सांगली (Sangli) लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण मतमोजणी सरासरी 21 फेर्‍यात पूर्ण होणार आहेत. यासाठी 700 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून अडीच हजार पोलिसांचा पहारा असणार आहे.

दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यामध्ये धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह अन्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. या मतदारसंघातून विजयाचा गुलाल कोण उधळणार याचा निकाल तीन वाजेपर्यंत जाहीर होणार आहे.

Maharashtra Police
MVA Vs Mahayuti : एक्झिट पोल खोटा! राज्यात आम्हीच 'किंग'; महायुती अन् आघाडीला भलताच कॉन्फिडन्स..

विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल

मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई यांची नियुक्ती केली आहे. पोस्टल मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी प्रत्येक टेबलवर एक सहाय्यक निवडणूक अधिकारी, एक सुपरवायझर, दोन सहायक व एक सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ईटीपीबीएस मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी दोन सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Maharashtra Police
Shahaji Patil: काय ती लोकसभा.. काय ती विधानसभा.. कोल्हापुरात शहाजी बापूंचा डायलॉग फिरवला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com