Sangli lok Sabha Election News : सांगलीतील धग कायम; विश्वजित कदम, पाटलांची माघार नाही, उलट 'मविआ'ला दिला 'हा' सल्ला

Political News: सांगली लोकसभेच्या जागेबाबत महाविकास आघाडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
 Vishal Patil, Vishwajit Kadam
Vishal Patil, Vishwajit KadamSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे ही जागा काँगेसला मिळावी अशी मागणी नेहमीच पक्ष श्रेष्टींकडे केली होती. त्यानुसार बुधवारी सांगली जिल्हा कोअर कमेटी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सांगली लोकसभेच्या जागेबाबत महाविकास आघाडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अंतिम बैठक मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत झाली. या बैठकीत सांगली व भिवंडी या वादग्रस्त जागेवर चर्चा करण्यात आली. मात्र, सांगलीची जागा शिवसेना (Shivsena) व भिवंडीची जागा राष्ट्रवादीने (Ncp) सोडण्यास नकार दिल्याने सांगलीतून चंद्रहार पाटील यांची महाविकास आघाडीकडून(Mahavikas Aghdi) उमेदवारी जाहीर झाली. (Sangli lok Sabha Election News)

 Vishal Patil, Vishwajit Kadam
Nashik Loksabha Constituency: घोलप, गोडसेंच्या 'होमग्राउंड'वर ठाकरेंच्या शिलेदाराचा जलवा...

या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीपर्यंत प्रयत्न करूनदेखील आमदार विश्वजित कदम व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना अपयश आले. त्यामुळे हे दोघेजण मंगळवारपासून नाराज होते.

या नाराजी नाट्यानंतर बुधवारी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर झाले असले तरी अद्याप काही जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे भविष्यात जागा अदलाबदल होऊ शकते. भाजपच्या पराभवाची तयारी आम्ही केली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळणे आवश्यक असल्याचे कदम यावेळी बोलताना म्हणाले.

या बैठकीस आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 Vishal Patil, Vishwajit Kadam
Sangli Lok Sabha Constituency : मोठी बातमी! काँग्रेस नेते विश्वजित कदम, विशाल पाटील ‘Not Reachable’

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com