Nashik Loksabha Constituency: घोलप, गोडसेंच्या 'होमग्राउंड'वर ठाकरेंच्या शिलेदाराचा जलवा...

Loksabha Election 2024 : स्थानिक माजी आमदार योगेश घोलप गैरहजर होते. त्यांनी अद्याप प्रचारात सहभाग घेतलेला नाही.
Nashik Loksabha Constituency
Nashik Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Shivsena Loksabha News: नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतील प्रचंड गोंधळ सुरूच आहे. महायुतीकडून विविध सर्वेचा आधार घेत शिवसेनेच्या शिंदे गटाला कोंडीत पकडण्यात आले आहे. त्यांच्या तीन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यात नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांचाही समावेश आहे.

याचवेळी माजी मंत्री बबन घोलप, खासदार हेमंत गोडसे एकनाथ शिंदे गटासोबत गेले. विहितगाव हा या नेत्यांचा बालेकिल्ला. मात्र, या बालेकिल्ल्यात मंगळवारी (ता.9) कार्यकर्त्यांनी इतिहास घडवला.

नाशिक मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी शिंदे गटात गेलेले बबन घोलप यांच्या विहितगाव या 'होम ग्राउंड'वर वाजे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी सामान्य कार्यकर्ते दिवसभर झटत होते.

Nashik Loksabha Constituency
Vasant More News : 'बारामती, शिरुरमध्ये कला दाखवून देईन', वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा

जिल्हा उपप्रमुख केशव पोरजे यांनी बोलावलेल्या मेळाव्याला उत्तम कोठुळे, योगेश म्हस्के, विशाल गाडेकर, आत्माराम आढाव, संजय कोठुळे, नितीन हंडोरे, किरण डहाळे, शेखर पवार यांनी हजेरी लावली. पण या मेळाव्याला स्थानिक माजी आमदार योगेश घोलप गैरहजर होते. त्यांनी अद्याप प्रचारात भाग घेतलेला नाही. लोकसभा प्रमुख विजय करंजकर वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज आहेत.

त्यामुळे या सर्व प्रमुख नेत्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली होती. समर्थकांनी या मेळाव्याला जाऊ नये यासाठी दूरध्वनी ही करण्यात आले होते. मात्र, शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावत प्रचार बैठकीचे रूपांतर मोठ्या मेळाव्यात केले. त्यामुळे हा मेळावा चर्चेचा विषय ठरला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे गटाचे खासदार आणि संभाव्य उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे हे कार्यक्षेत्र आहे. गोडसे यांनी या प्रभागाचे नगरसेवक म्हणून देखील काम केले आहे. माजी आमदार योगेश घोलप आणि माजी मंत्री बबन घोलप यांचे हे 'होम ग्राउंड' आहे. असे असताना या मेळाव्याला मिळालेले प्रतिसाद वेगळेच संदेश देऊन गेला. नेते शिंदे गटात गेले तरीही कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत, असा हा संदेश होता.

सामान्य मतदारांनी देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाबाबत सहानुभूती असल्याची भावना या मेळाव्यात व्यक्त झाली. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच ठाकरे गटाचे उमेदवार वाजे यांनी मोठ्या प्रतिसाद मिळवून प्रचाराची सुरुवात दणक्यात केली आहे.

Nashik Loksabha Constituency
Karmala News: महायुतीच्या प्रचारापासून दूर असलेल्या नारायण पाटलांची चंद्रकांतदादांनी घेतली भेट...

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसह उमेदवार वाजे या मेळाव्यासाठी आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून वाजे यांच्यावर फुलांची उधळण केली. माजी मंत्री बबन घोलप यांच्या या होम ग्राउंडवर हे स्वागत झाले. नेते शिंदे गटात गेले तरीही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेलेला नाही, असा संदेश देण्यात हा मेळावा यशस्वी झाला त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनाही हा धक्का होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Nashik Loksabha Constituency
Vasant More News : 'बारामती, शिरुरमध्ये कला दाखवून देईन', वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com