Sangali News : सांगली पालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्येच 'फ्री स्टाईल' हाणामारी!

Sangali News : टेंडर मिळण्यावरून एकमेकांना भिडले?
Sangali News :
Sangali News : Sarkarnama

Sangali News : सांगली महापालिकेत आज तुफान हाणामारी घडून आली आहे. महापालिकेचे भाजपचे माजी उपमहापौर व विद्यमान स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी व भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अतुल माने यांच्यातच आज महापालिकेमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर दोघांच्या कार्य़कर्त्यांनी पालिका परिसराला घेरले. काही काळ परिस्थिती तणावाची बनली होती. समोरच असलेल्या पोलिस ठाण्यातून पोलिस दाखल झाल्याने वातावरण निवळले. निविदा मिळवण्यावरून हा वाद घडून आला होता.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आज पालिकेत स्थायी समितीची सभा प्रस्थावित होती. यासाठी सूर्यवंशी व इतरही सभासद यावेळी पालिकेत उपस्थित राहिले होते. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. दरम्यानच्या, माने महापालिकेच्या मंगलधाम कार्यालय येथे आले होते. महापालिकेतील विविध विकासकामाचे ठेके आपल्या मर्जीतल्या लोकांना मिळावेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो.

माने ज्या प्रभागात काम करतात त्यात म्हणजे पोलिस मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला वाहणाऱ्या चैत्रबन नाल्याच्या बांध बंदिस्तीसाठी दहा कोटींच्या विकास कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हा नियोजनमधून हे काम करण्यावरून तसेच हा निधी पालिकेऐवजी जिल्हा नियोजनकडे वर्ग करण्यावरूनही यापुर्वी वाद रंगला होता.

Sangali News :
Chinchwad : पोटनिवडणूक चिंचवडची, फटका पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांना...

आज माने या कामासंदर्भात महापालिकेत आल्याची माहिती सूर्यवंशी यांना मिळाली. यानंतर दोघांमध्ये पहिल्यांदा फोनवरून वादावादी झाली. यानंतर माने यांनी महापालिकेचे मुख्यालय गाठले. सभा सुरु असतानाच मध्येच सूर्यवंशी बाहेर आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात थेट जुंपली. काही नगरसेवकांकडून वाद सोडवण्यासाठी प्रयत्न झाले.

Sangali News :
Old pension : योजना नाकारण्याची भाजप नेतृत्वाची स्पष्ट भूमिका गाणारांसाठी धोक्याची ठरणार?

थोड्यात अवधीत या ठिकाणी पोलिस आले. पोलिसांनी तत्काळ माने यांना बाजूला घेत शहर पोलिस ठाणे गाठले. त्यामळे वातावरण तंग झाले होते. ही वार्ता कार्यकर्त्यांना समजताच सगळे पालिकेच्या दिशेने धावले. यामुळे सायंकाळपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी दोघांचीही फोनवरून समजून काढली.

दरम्यान प्रकारावर अतुल माने म्हणाले की, "माझ्या प्रभागातील विकास कामे आहेत. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी आलो होतो. सभापतींचा या कामातील हस्तक्षेप सुरू आहे, तो आम्ही सहन करणार नाही," असा इशारा माने यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com