Nagpur Teachers Constituency Election : अवघ्या एकोणचाळीस हजारांच्या घरात मतदार असलेल्या नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तब्बल २२ उमेदवार लढत देत असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजानाचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पहिला पसंती कोटा पूर्ण करणे अवघड आहे. त्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपने (BJP) नागोराव गाणार तर काँग्रेसने (Congress) सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) दीपककुमार खोब्रागडे, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे, बसपाच्या रिमा रंगारी, राष्ट्रवादीचे (NCP) बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यासह सुमारे दोन डझन उमेदवार मतांचे गठ्ठे घेऊन बसले आहेत. ते फोडण्याची कसरत प्रस्थापितांना करावी लागणार आहे.
नागो गाणार यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह भाजपची फौज आहे. असे असले तरी गाणारांना तिसऱ्यांदा संधी दिल्याने अनेकांची नाराजी कायम आहे. त्यांच्या समर्थनाची घोषणा लांबवून भाजपने प्रत्यक्ष बंडखोरी होऊ दिली नाही. असे असले तरी मतदानातून काही मतदार आपला रोष व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या बड्या नेत्यांनाही हा धोका जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना कामाला लावण्यात आले आहे.
जुनी पेंशन योजना नाकारण्याची भाजप नेतृत्वाची स्पष्ट भूमिका गाणारांसाठी धोक्याची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गाणारांसमोर अनेक आव्हाने असली तरी महाविकास आघाडीचे समर्थन लाभलेले सुधाकर अडबाले सहजासहजी जिंकून येतील, असेही समजण्याचे काही कारण नाही. गंगाधर नाकाडे यांना उमेदवारी देऊन माघार घ्यायला लावल्याने शिवसैनिकांचा रोष काँग्रेसवर आहे. शिवसेनेचे नेते खुलेपणाने प्रचारात उतरल्याचे अद्यापही दिसलेले नाही. सेनेचे मतदार अडबाले यांना धक्का देऊ शकतात.
मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजेंद्र झाडे यांच्यासाठी ही लढाई आर-पारची आहे. शिक्षक भारतीचाही सर्व रोष काँग्रेसवरच आहे. झाडे यांच्यासाठी ही निवडणूक आर-पारची लढाई आहे. काँग्रेसने शब्द फिरवल्याने झाडे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होऊ लागली आहे. दलित मतांवर दावा सांगणारे अनेक उमेदवारही रिंगणात आहेत. ही मते आघाडीकडे वळवण्यासाठी अडबाले यांना मोठी कसरत करावी लागणार, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.