Sangli News 06 Oct : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसातच होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाची राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे.
रविवारी ही यात्रा सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा येथे पोहोचली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं कौतुक केलं. शिराळा येथील सभेत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वोच्च पद हे जयंत पाटील यांच्याकडे असेल.
महाराष्ट्रातील भलेभल्यांची वातावहत होत होती, पक्षाचं काय होणार हा प्रश्न पडला होता. तेव्हा मला अभिमान वाटला की, मी अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो की जे नेतृत्व सुसंस्कृत आहे. पण टप्प्यात आला की कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही, असंही अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले.
यावेळी कोल्हे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांना जिजाऊ, सावित्री, अहिल्याबाई यांचा वारसा लाभतो त्या माझ्या माता भगिनींनी नक्कीच हुशार आहेत. 1500 रुपयात आम्ही भविष्य कुणाच्या हातात देत नाही, एवढं समजणाऱ्या माता भगिनी हुशार आहेत. आता थोड्या दिवसात दिवाळी आहे, आता खोबरं आणि तेलाचा डबा किती रुपयांनी वाढला आहे.
यात आता 1500 रुपये पुरणार कसे?, असा सवालही कोल्हे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत भरपूर लक्ष्मी दर्शन झाले पण तरीही राज्यातून 31 खासदार हे महाराष्ट्राने दिल्लीत पाठवले आहे. यामुळे आता महाराष्ट्रात लाडकी बहीण लाडकी झाली आहे, असा टोलाही अमोल कोल्हे यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर लगावला.
"गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. जर त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात एवढ्या घटना घडल्या असतील तर खरच महाराष्ट्रला हा प्रश्न पडतो की हे तीन तीन नेते एक फुल दोन हाफचं सरकार तीन तीन बॅनर लावतात. कोण म्हणत मुख्यमंत्री लाडकी बहीण, गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण, नागपूरवाले म्हणतात लाडका देवाभाऊ.
एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असताना जर बहिणाला सुरक्षितता देत नसतील तर महाराष्ट्रातील माता भगिनींनी हा निर्णय घ्यायला पाहिजे, की आया बहिणींच्या हक्काचं सरकार यायला हवं. ते शिवस्वराज्य यायला हवं याची भूमिका तुम्हा सर्वांना घ्यावं लागेल, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.