Eknath Shinde : मुलावर केलेली 'ती' टीका मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी, उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "बाळासाहेब काय होते, बाळासाहेबांकडे दिल्लीपासून देशभरातली लोक येत होती. आज दिल्लीच्या गल्लोगल्ली कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा, माझं नाव जाहीर करा. हा केविलवाणा प्रयत्न बघून बाळासाहेबांना किती वेदना होत असतील. आम्ही छातीठोकपणे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे."
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 06 Oct : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यभरात अनेक नेते कार्यकर्त्यांनी पक्षबदल करत आहेत.

दरम्यान, आज रविवारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे माजी स्थायी सभापती शिंदे गटाचे नेते दीपेश मात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली.

ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' असा उल्लेख करीत टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे बिथरले आहेत, मानसिकता बिघडली आहे.

संतुलन बिघडले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झाली आहे. म्हणून मी म्हणतो हिऱ्यापोटी गारगोठी, असा टोलाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण दर तीन दिवसांनी बदलतंय; नीलम गोऱ्हे असं का म्हणाल्या?

"बाळासाहेब काय होते, बाळासाहेबांकडे दिल्लीपासून देशभरातली लोक येत होती. आज दिल्लीच्या गल्लोगल्ली कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा, माझं नाव जाहीर करा. हा केविलवाणा प्रयत्न बघून बाळासाहेबांना किती वेदना होत असतील. आम्ही छातीठोकपणे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. म्हणून हजारो, लाखो बहिणी, शेतकरी या सरकारला दुवा देत आहेत. मला त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायचं नाही. कामातून उत्तर देतो म्हणून ते बिथरले आहेत. आरे तुम्ही बापाशी भिडा ना, लहान मुलाशी काय भिडताय", असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

"आधीचे सरकार लेना होते हे सरकार देना आहे. दोन वर्षातील हे आमचे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारच्या काम पाहिले. आम्ही काम केली आहे. त्यामुळे आमचं हे महायुतीचं सरकार पुन्हा येईल.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी महिलांनी आम्हाला राख्या पाठवल्या. सरकारने दिलेले आम्हाला पैसे उपयोगी पडले, असं महिला आम्हाला सांगतात. आम्ही सुरू केलेल्या योजना फक्त कागदावर नाहीत, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Congress Politics : काँग्रेस 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडणार! प्रदेशाध्यक्षांच्या दाव्याने भाजपला टेन्शन

उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली टीका

आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबवली येथील शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आपले अडीच वर्ष सरकार होते. पण गद्दारांनी भाजपाच्या नादी लागून गद्दारी केली आणि आपले सरकार पाडले.

आता तिकडे गद्दार जाऊन बसलेत. तुम्हाला वाईट अनुभव आल्यामुळे तिकडे काय परिस्थिती आहे हे कळल्यानंतर तुम्ही स्वगृही परतलात. आता तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या मुळ शिवसेनेत आला आहात.आता जे तिकडे जे गद्दार जाऊन बसलेत त्यांना मी परत घेणार नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com