

Sangali News : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीची घोषणा दोन दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यातच आता सांगली-मिरज महापालिकेसाठी आमदार जयंत पाटील यांच्यासह विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी महाआघाडी होणार, असे सूतोवाच करून संभ्रम संपवला आहे. गेले काही दिवस त्यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू होत्या. आता महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली-मिरज महापालिकेचा इतिहास पाहिला, असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (NCP) निवडणुकीत मतदारांनी मोठी भूमिका दिली आहे. या सर्व घडामोडी, राजकीय व्यूहरचनेत माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नेहमीच आक्रमक भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे त्यांना येथे निवडणूक नवी नाही. ते केवळ त्यांच्या पक्षाच्या नव्हे, तर काँग्रेससह अन्य पक्षांच्या उमेदवार निश्चितीत व्यक्तिशः सहभागी असतील. महाविकास आघाडी म्हणून नेटाने लढणार असल्याची त्यांनी जाहीर केले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 140 जणांनी उमेदवारी मागितले असून शुक्रवारी (ता. 19) त्यांच्या मुलाखती होणार आहेत.
दिवंगत नेते मदन पाटील यांनी एकेकाळी राष्ट्रवादी म्हणून महापालिका पूर्ण ताब्यात घेतली होती. त्यानंतर 2003 मध्ये महापालिकेत सत्तांतर झाले. त्यावेळी काँग्रेसकडून सत्ता हस्तगत करून सत्ता परिवर्तन झाले होते. 2008 मध्ये जयंत पाटील (Jayanat Patil) यांनी महाआघाडीच्या रुपाने पूर्णतः सत्ता मिळवली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे मुख्य नेते होते.
गेल्या सत्तेत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करीत दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौर करून वर्चस्व सिद्ध केले होते. त्यावेळी काँग्रेसचा उपमहापौर झाला होता. महापालिकेतील सत्ता समीकरणातील शेखर माने आणि संजय बजाज असे दोन हुकमी नेते त्यांच्याकडे आहेत. यावेळीही त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या शिफारशीनुसार उमेदवार ठरवले जातील, असे जाहीर करीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीचे नेते राहुल पवार, शीतल खाडे, संगीता हारगे, संजय औंधकर, सचिन जगदाळे आदींच्या समितीने संवाद दौरा पूर्ण केला आहे. या पक्षातील अनेकांनी सत्तेतील राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला आहे. त्यांची भाजपसोबत महायुती होणार का, झाली तर तिथे उमेदवारी मिळणार का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यानंतर जिल्ह्यात शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तसे येथे घडणार का, हा शेवटी प्रश्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वच प्रभागांतून 140 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. महाआघाडीअंतर्गत जागावाटप अंतिम झाल्यानंतरच खऱ्या अर्थांना हालचाली गतिमान होणार आहेत. साधारण वीस ते पंचवीस जागांवर ताकदीने लढता येईल, असा त्यांचा होरा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तशी तयारी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.