BJP Candidate List : पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, भाजपची उमेदवार यादी फायनल; इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात!

BJP PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची अंतिम यादी तयार केली असल्याची माहिती आहे. या यादीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान वर्षावर निर्णय होणार आहे.
pune bjp Candidate List Update
pune bjp Candidate List UpdateSarkarnama
Published on
Updated on

Pune BJP News : पुणे महापालिकेत भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. इच्छुक उमेदवारांची मुलाखती देखील भाजपकडून घेण्यात आल्या. मात्र, मुलाखती हा केवळ फार्स असून आधीच 100 उमेदवारांची यादी तयार ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातच आज (बुधवारी) मुख्यमंत्र्यांचे निवास्थस्थान वर्षावर पुण्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांचे नाव फायनल केले जाणार आहे.

उमेदवारांचे नाव अंतिम करणे ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला पुण्यातील कोणते नेते उपस्थित राहणार हे समजू शकले नाही. मात्र, हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. हेच नेते वर्षावर उपस्थित असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप युती होण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे शहरात शिवसेनेची ताकद नाममात्र आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला अधिक जागा येणार नाही. इतर पक्षातील अनेक दिग्गज उमेदवार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपची उमेदवारी यादी जाहीर होताच कोणत्या पक्षांना धक्का बसणार याची देखील चर्चा सुरू झाली आहे.

pune bjp Candidate List Update
Pradnya Satav news : मोठी बातमी : काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार? अधिवेशनादरम्यान काय घडलं?

'त्या' जागांवर कार्यकर्त्यांना संधी

इतर पक्षातून भाजपमध्ये होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजपमधील कार्यकर्ते चितेंत होते. मूळ भाजपच्या लोकांनाच उमेदवारी मिळणार नाही पण बाहेरून आलेल्यांना उमेदवारी मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते. त्यावर भाजपने तोडगा काढला असून जेथे 100 टक्के विजयाची खात्री आहे. त्या जागांवर मूळ भाजपच्या असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

इच्छुकांचे देव पाण्यात

भाजपकडून उमेदवारी मिळाली म्हणजे विजय निश्चित असे चित्र महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्या संभाव्या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मागील दोन महिन्यांपासूनच प्रयत्न सुरु केले होते. मात्र, आरक्षण आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे संधी हुकणार की काय यामुळे अनेक इच्छुक चिंतेत आहेत. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काही उमेदवार देवदर्शन करत आहेत. उमेदवारीसाठी काही जणांनी देव पाण्यात ठेवल्याचीही चर्चा आहे.

pune bjp Candidate List Update
Sangli News: राजकीय वारसदारांमध्ये संघर्ष? प्रभाग 3 ठरतोय हॉटस्पॉट; आमदार-पीए सुपुत्रांमध्ये निवडणुकीपूर्वीच लढत सुरु

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com