Sangli Politics : सांगलीतील 'देशमुख बंधुंचं' पहिल्यांदाच फाटलं : संस्थांसाठी सेटलमेंट की खरंच कडाक्याची भांडणं?

Sangli Politics : आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादीमधून तर अमरसिंह देशमुख यांनी भाजपच्या माध्यमातून उमेदवार उभे केल्याने स्थानिक राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Rajendra Deshmukh and Amar Singh Deshmukh enter Atpadi Municipal Election with independent candidates.
Rajendra Deshmukh and Amar Singh Deshmukh enter Atpadi Municipal Election with independent candidates.Sarkarnama
Published on
Updated on

नागेश गायकवाड :

माजी आमदार राजेंद्र देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांनी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपातून स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरविले आहेत. देशमुख बंधूंनी राजकारणात पहिल्यांदाच सवतासुभा मांडला आहे. तो राजकीय अपरिहार्यता की सोय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काही वर्षापासून राजेंद्र देशमुख व अमरसिंह देशमुख अत्यंत बॅडपॅचमधून जात आहेत. दोघांची भूमिका, विसंवाद यावरून कार्यकर्ते अस्वस्थ व संभ्रमात आहेत. विधानसभेला राजेंद्र देशमुख यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली.

भाजपातील अमरसिंह यांनी पक्षाचा उमेदवार नसल्याने भावासोबत जाऊन बंधू प्रेम सांभाळले. त्यानंतर राजेंद्र देशमुखांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावर अमरसिंह यांनी त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपसोबत राहणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. दोघांनी दोन वेगवेगळे पक्ष निवडले. त्याप्रमाणे कामही सुरू केले आहे.

Rajendra Deshmukh and Amar Singh Deshmukh enter Atpadi Municipal Election with independent candidates.
Gopichand Padalkar News : गोपीचंद पडळकरांना झटका; आटपाडीत झाला 'करेक्ट कार्यक्रम'

आता नगरपंचायत निवडणुकीत अमरसिंह देशमुख यांनी भाजपातून कार्यकर्त्यांना मैदानात उतरवले आहे, तर राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादीतून उमेदवार उभे केले आहेत. दोघांनी दोन वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवार उभे केले आहेत. दोघांनीही स्वतः निवडणूक कक्षात जाऊन कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे देशमुख बंधू वरकरणी तरी विरोधातच असल्याचे दिसते.

दोघांनीही नगरपंचायत निवडणुकीत सवतासुभा मांडला आहे. त्यावर तर्कवितर्क सुरू आहेत. दोघांनी परस्पर विरोधी घेतलेली भूमिका राजकीय अपरिहार्यता की सोयीची ठरवून घेतली, यावर चर्चा सुरू आहे. पण दोघांचीही धडपड कारखान्यासाठी चालली आहे. राजेंद्र देशमुख यांच्याकडे संस्था नसल्याने त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस केले. तर अमरसिंह देशमुख यांच्याकडे शिक्षण संस्था, बँक, दूध संघ अशा चांगल्या संस्था आहेत. त्यांना धाडसी निर्णय घेण्यावर मर्यादा आली.

राजेंद्र देशमुख यांच्याकडील सूतगिरणी थकबाकी पोटी जिल्हा बँकेने ताब्यात घेतली. ती अमरसिंह देशमुख यांनीच विकत घेतली. सूतगिरणीच्या जागेचे प्लॉटिंग करून विक्री केली. त्यानंतर पुन्हा सूतगिरणी सहकारी करून राजेंद्र देशमुख यांच्याकडे सोपविली. या प्रक्रियेवरून दोघांतील संवाद थांबला. त्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाकडे तक्रार केली. साऱ्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली. महामंडळाचा देण्याचा बोजा सूतगिरणीवर चढवला.

Rajendra Deshmukh and Amar Singh Deshmukh enter Atpadi Municipal Election with independent candidates.
Solapur ZP Election : बळिराम साठेंविरोधात रणशिंग फुंकले; दिलीप माने, यशवंत माने अन्‌ शहाजी पवारांची एकत्र खलबत

यात आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अमरसिंह यांना सातत्याने लक्ष्‍य केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप सत्तेत आहे. त्यामुळे भाजपसोबत राहिल्याचा उपयोग होईल आणि अडचणी येणार नाहीत, असा कयास त्यांच्या बाजूने बांधला जातोय. वेगळी भूमिका घेतल्यास संस्थांना त्रास होऊ शकतो, याची भीती की, भाजप प्रेमापोटी पण बंधुप्रेम बाजूला ठेवून भाजपसोबत राहिलेत. दोघांचेही तेच कार्यकर्ते. त्यातील युवा अमरसिंह यांच्यासोबत तर ज्येष्ठ राजेंद्र देशमुख यांच्यासोबत गेलेत.

काहींनी दोघांच्याही भाजप, राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर काहींनी दोघांनाही रामराम केला. पण या राजकारणामुळे दोघांनी एकत्रित ठरवून दोन भूमिका घेतली आहे की, खरोखरच सवतासुभा मांडला आहे, यावरून कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com