Gopichand Padalkar News : गोपीचंद पडळकरांना झटका; आटपाडीत झाला 'करेक्ट कार्यक्रम'

Atpadi Nagar Panchayat Election : एकीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख एकत्र येत असताना दोघांचा एकेक मोहरा शिवसेनेच्या गळाला लागल्याने भाजपला धक्का बसला आहे.
MLA Gopichand Padalkar
MLA Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Local Elections 2025 : आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला जोरदार झटका दिला आहे. शिवसेनेने भाजपचे शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी, बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावले आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जतमध्ये भाजप आणि शिवसेनेत शह-प्रतिशहाचा खेळ रंगला आहे.

नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याआधीच नितीन कुलकर्णी यांनी प्रभाग १२ मधून भाजपातून उमेदवारी जाहीर केली होती. तसा त्यांनी प्रचारही सुरू केला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनी इच्छुकांच्या घेतलेल्या बैठकीला ते उपस्थित होते. पण शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनीही प्रभाग १२ मध्ये डॉ. विनय पत्की यांची उमेदवारी जाहीर करून खळबळ उडवून दिली.

डॉ. पत्की यांनी ब्राह्मण समाजाची एकत्रित बैठक घेऊन सर्वांचा पाठिंबा मिळवला. त्यात भाजपचे शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी त्यांच्या गळाला लागले. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले चंद्रकांत दौंडे यांचे बंधू, बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावण्यात यश मिळवले आहे. भाजपच्या देशमुख-पडळकर दोन्ही गटाचे दोन मोहरे तानाजीराव पाटील यांनी शिवसेनेत घेतले.‌

MLA Gopichand Padalkar
Uddhav Thackeray News : शिंदेसेनेच्या विरोधानंतरही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाच दिला 'तो' मान; निवडणुकीच्या तोंडावर निर्णय...

एकीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख एकत्र येत असताना दोघांचा एकेक मोहरा शिवसेनेच्या गळाला लागल्याने भाजपला धक्का बसला आहे. शिवसेनेने यावेळी बोलण करण्यात वेळ न दवडता स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू ठेवली आहे.

MLA Gopichand Padalkar
Top 10 News : पुन्हा नितीश कुमारच, हिंदू 'व्होट बँके'वरून राज ठाकरेंचा संताप, फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंनाच मान... वाचा महत्वाच्या घडामोडी

सध्या भाजप आणि शिवसेनेत शह-प्रतिशह देण्याचा डाव रंगला आहे. रोज वेगवेगळ्या गुप्त बैठका आणि चर्चा सुरू असून नवीन घडामोडी घडू लागल्या आहेत. माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी विकास आघाडीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. यंदाची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com