Sanjay Kaka Patil : सांगलीत राजकारण पेटलं! संजयकाका पाटलांची दादागिरी; माजी उपनराध्यक्षांना घरात घुसून मारहाण

Sanjay Kaka Patil Vs NCP Leader Ayyaz Mulla : संजय काकांची माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून मारहाण; काय आहे प्रकरण?
Sanjay Kaka Patil
Sanjay Kaka Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजपचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राजकारण हे हाणामारी पर्यंत गेल्याचे समोर येत आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून मारहाण केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

या मारहाणीच्या घटनेनंतर कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर या मारत संजय काका पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा ही मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली.

यावेळी खासदार व त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला व मुलांनाही मारहाण केली. यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईला ही स्वतः खासदारांनी ढकलून दिले. ही घटना आज सकाळी साडे सातच्या दरम्यान घडली.

Sanjay Kaka Patil
Satej Patil VS Mahadik : 'प्रगती बघून बंटी घाबरलाय!', महाडिक गटाने सतेज पाटलांना डिवचले

सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी संजय काका पाटील यांचे पीए खंडू होवळे हे मुल्ला यांच्या घरी आले. संजय काका भेटायला येणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला. तोपर्यंत दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार संजय पाटील (Sanjay kaka Patil) यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून अय्याज मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केली.

Sanjay Kaka Patil
Mangalvedha politics : ‘भाजपच्या आमदाराने यूपी, बिहारच्या कामगारांना बनविले मतदार’

दरम्यान या घटनेच्या विरोधात, आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटलांचं कवठेमहांकाळ पोलीस ठाणे समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. कवठेमंकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून त्यांच्या आईला देखील मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राजकीय वादातून मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आला आहे. संजयकाका पाटील विरोधात कारवाईसाठी आमदार सुमनताई व रोहित पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर सुरू केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातर्फे तालुक्यातील या गुंडगिरी विरुद्ध उद्या निषेध सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com