NCP SP News : "चिंता करु नका, तासगावची सीट फिक्स पण..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या लेकाला केली 'ही' विनंती

Sangli Politics Jayant Patil On Rohit Patil : "आता राज्यातील वातावरण बदललं आहे. रोहितदादांनी सांगितलं की राष्ट्रवादीचा पहिला आमदार तासगाव मतदारसंघातून निवडून येणार आणि आलाच पाहिजे. डोळे झाकून तो निवडून येईल."
Jayant Patil, Rohit Patil
Jayant Patil, Rohit PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 13 Sep : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय निश्चित असून तासगावची सीट आल्यात जमा आहे, असा विश्वास व्यक्त केला.

शिवाय यावेळी त्यांनी आर.आर पाटील (R.R Patil) यांचे पूत्र रोहित पाटील यांना या निवडणुकीची चिंता करू नका असा, सल्ला देताना एक विनंती देखील केली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे एका पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रोहित पाटलांचा विधानसभेला विजय फिक्स असल्याचं भाकीत केलं. ते म्हणाले, "आता राज्यातील वातावरण बदललं आहे. रोहितदादांनी सांगितलं की राष्ट्रवादीचा पहिला आमदार तासगाव मतदारसंघातून निवडून येणार आणि आलाच पाहिजे. डोळे झाकून तो निवडून येईल. त्यामुळे तुम्ही आता महाराष्ट्रातही वेळ द्यायला हरकत नाही.

कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे, तुम्ही त्याची काही चिंता करु नका. तुमची सीट मोजल्यात जमा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की, पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात फिरले पाहिजे."

Jayant Patil, Rohit Patil
Vishal Patil : खासदार विशाल पाटलांनी पुन्हा मारली पलटी; आता म्हणतात, ‘रोहित पाटलांनाच आमदार करणार...’

दरम्यान, यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादीतील फूटीनंतर आर.आर आबा यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्यावर मोठा दबाव असल्याचंही सांगितलं. आपल्या पक्षातून अनेक लोक बाहेर गेले, यावेळी सुमनताईंना किती फोन येत होते, किती दबाव होता मला माहिती आहे. मात्र, त्या दबावाला बळी पडल्या नाहीत. त्यांनी पवारसाहेब जिथे असतील तिथे आम्ही असणार असं सांगितलं. अशी एकनिष्ठा पाहिजे, असं पाटील म्हणाले.

Jayant Patil, Rohit Patil
Beed Politics : "...तर मी धनंजय मुंडेंचा जाहीर सत्कार करणार"; बजरंग सोनवणे असं का म्हणाले?

तर राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, पूर्वी लोक म्हणायचे यांना उमेदवार मिळणार नाहीत. पण, आता वातावरण बदललं आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन-तीन उमेदवार उमेदवारी मागत आहेत. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com