MNS : राज ठाकरे हाजीर हो ! ; शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट

राज ठाकरे काल गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.
Raj Thackeray news
Raj Thackeray newssarkarnama
Published on
Updated on

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्याविरुद्ध सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्याने शिराळा न्यायालयाने (Shirala court) बुधवारी त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. आता राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Raj Thackeray latest news)

रेल्वे भरतीमध्ये २००८ मध्ये 'स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या,' या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं. विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत हा खटला सुरु आहे.

वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. याप्रकरणी काल (८ जूनला) सुनावणी झाली. या सुनावणीला राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.

Raj Thackeray news
विधान परिषदेसाठी भाजपकडून सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोतांना संधी..

राज ठाकरेंना करोनाची लागण झाली असल्याने काल झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले. मनसेचे नेते शिरीष पारकर (Shirish Parkar) या सुनावणीसाठी उपस्थित होते.त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com