Death Sentence : आठ वर्षीय मुलीची हत्या; 70 वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा

Vita court sentences 70-year-old accused to death in minor girl murder case : गळवेवाडीतील 2018 च्या प्रकरणात वैद्यकीय, न्यायवैज्ञानिक पुरावे आणि 19 साक्षीदारांच्या जबाबांवर न्यायालयाचा निकाल
Sangli Crime News
Sangli Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangli Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि त्यापैकी एका आठ वर्षीय मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणात सांगलीतील विटा न्यायालयाने 70 वर्षीय आरोपी शिवाजी काळेल याला फाशीची शिक्षा ठोठावली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे 7 जानेवारी 2018 रोजी आठ वर्षांची मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. कुटुंबीय आणि पोलिसांनी तिचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी, 8 जानेवारीला गळवेवाडी येथील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.

वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालातून मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला; मात्र सुरुवातीला आरोपीचा ठावठिकाणा लागला नव्हता.

Sangli Crime News
Dheerajsinh Murder Case : कलबुर्मे अन् टिपरसेंकडून हिंदुत्ववादी कार्यकर्ते लक्ष; आमदार जगतापांच्या अहिल्यानगर पोलिसांवरील आरोपांनी खळबळ

दरम्यान, 26 जुलै 2018 रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात शिवाजी काळेलविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील पीडित मुली आणि त्यांच्या मातांचे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवण्यात आले. या जबाबांमधून 7 जानेवारी 2018 रोजीच्या घटनेच्या दिवशी आरोपी आणि मृत मुलगी एकत्र असल्याची माहिती तपास यंत्रणेच्या समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून काळेल याला आठ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी केले.

Sangli Crime News
Manoj Jarange Patil Mumbai March : 18 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगेंचा मुंबई दिशेने प्रवास; प्रकृती खालावली, रक्तदाब-साखर कमी, तरी आंदोलनावर ठाम

तपासादरम्यान आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह घरातील लोखंडी कणगीत लपवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानंतर नातेवाइकांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तपासात करण्यात आला. तसेच मुलीचा शोध लावणाऱ्यास 50 हजार रुपये बक्षीस देण्याचेही आरोपीने सांगितल्याचे तपासात नमूद करण्यात आले. तपासानुसार, रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चादरीत गुंडाळलेला मृतदेह घराजवळील जगमाईच्या विहिरीत टाकण्यात आला. पोलिसांनी तपासादरम्यान लोखंडी कणगी आणि चादर जप्त केली.

न्यायवैज्ञानिक पुरावे ठरले महत्त्वाचे

जप्त केलेल्या चादरीवर पीडित मुलीची टिकली आढळली. तिच्या आजी-आजोबांनी ती टिकली ओळखल्याचे सरकार पक्षाच्या पुराव्यात नमूद करण्यात आले. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात लोखंडी कणगीत मानवी रक्त आणि शरीरातील द्रव आढळल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात सरकार पक्षाने न्यायालयात एकूण 19 साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि न्यायवैज्ञानिक अहवाल यांसह तपासात समोर आलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com