Shahaji Patil: माफी मागितल्यानंतरच शहाजी पाटलांची आंदोलकांनी सोडली वाट !

Maratha protesters : संतप्त आंदोलकांना शहाजी पाटलांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
Shahaji Patil
Shahaji Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur : मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमदार-खासदारांना मराठा आंदोलकांनी गावबंदी केली आहे. याचा फटका सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना चांगलाच बसला. पंढरपूरहून आपल्या मतदारसंघात शहाजी पाटील जात असताना त्यांची गाडी पंढरपुरात आंदोलकांनी अडवली. आंदोलक व त्यांच्या गाडीच्या चालकामध्ये खडाजंगी झाली.

संतप्त आंदोलकांना शहाजी पाटलांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शहाजी पाटलांनी आंदोलकांची माफी मागितली. त्यानंतर आंदोलकांनी त्यांना सांगोल्याला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. ठाकरे चौकात हा प्रकार घडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahaji Patil
Chetan Tupe: मराठा मोर्चाला आमदार चेतन तुपे फिरकलेच नाहीत; मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व्हायरल

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिक तीव्र झाला आहे. काही ठिकाणी आमदार-खासदारांची घरे पेटविण्यात आली आहेत. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. आज मुंबईतील आमदार निवासात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंकी यांच्या घराला पेटवण्यात आलं. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. राज्यातील नेत्यांच्या घरांना आता पोलिस संरक्षण देण्यात आलंय. हा पोलिस बंदोबस्त आता वाढवण्यात आला आहे. मंत्र्यांसह आमदारांच्या घरांजवळ आता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांच्यासोबत शहाजीबापू पाटीलदेखील होते. शहाजी पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. आसाममधून आपल्या एका कार्यकर्त्याला केलेला त्यांचा कॉल राज्यभर प्रचंड व्हायरल झाला होता. शहाजी पाटील यांचे नाव निघताच 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...' हा डॉयलाग आठवल्याशिवाय राहत नाही.

Shahaji Patil
Bachchu kadu : फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेल्या बच्चू कडूंची राजकीय कोंडी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com