Sangola Politics : काका-पुतण्या संघर्ष; शहाजीबापूंविरोधात त्यांचे नऊ पुतणे 'तुतारी' वाजवणार?

Solapur Political News : गुवाहाटीला जाऊन मतदान मिळत नाही. मतदान पवार साहेबांच्या पाठीमागे आहे
Solapur Political News
Solapur Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangola News : महाराष्ट्राच्या राजकारणाला काका विरुद्ध पुतण्या राजकारणाचं एक वलय आहे. काका-विरुद्ध पुतण्या संघर्षांचं राजकारण महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलं आहे. काकांविरोधात बंड पुकारलेल्या पुतण्यांनी काकांचा शिरस्ता मोडत राजकारणाचा वेगळा मार्ग चोखाळल्याची अनेक उदाहरणे राज्याला नवीन नाही. आता महाराष्ट्रात अजून एक असेच उदाहरण समोर आले आहे. विशेष म्हणजे एक दोन नाही तर तब्बल नऊ पुतण्यांनी आपल्या आमदार काकांविरुद्ध बंड पुकारले आहे. (Latest Marathi News)

काय झाडी-काय डोंगर फेम शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील यांच्यासह त्यांचे सख्खे चुलत बंधू असे एकूण नऊ बंधूंनी आपले काका शहाजीबापूंविरोधात बंड पुकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शहाजीबापूंच्या नऊ पुतण्यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारल्याने आता याची जोरदार चर्चा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्येष्ठ नेते पवारांची (Sharad Patil) भेट घ्यायला गेलेल्या शहाजीबापू पाटलांचे पुतणे संग्रामसिंह पाटील म्हणाले, "पूर्ण काकांचा ग्रुपच शरद पवार गटात जाणार आहे. आम्ही नऊ पुतणे शरद पवार गटात जात आहोत. आमचे काकासु्दधा येतील अशी अपेक्षा आहे. गुवाहाटीला जाऊन मतदान मिळत नाही. मतदान पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. आम्ही शहाजीबापूंचे एकूण नऊ जण पुतणे आहोत. आम्ही नऊ जण प्रवेश करणार आहोत.

शहाजीबापूंचे (Shahajibapu Patil) सख्खे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतली आहे. त्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर शहाजी पाटील यांच्यासाठी धक्का मानला जाईल. कारण, शहाजी पाटील यांना घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घरात पडलेली फूट शहाजी पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com