अहमदनगर - अहमदनगर शहरातील बाजारपेठेत असलेल्या व्यापारी व फेरीवाल्यांच्या वादावर आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करत पडदा टाकला होता. मात्र काही फेरीवाल्यांनी मुंबईत जाऊन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची भेट घेतली. आझमींनी शहरातील बाजारपेठेतील फेरीवाल्यांची अतिक्रमणे काढू नयेत यासाठी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी आक्रमक झाले. त्यांनी आज आंदोलन केले. या आंदोलनात बोलताना आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांनी नाव न घेता अबू आझमींवर ( Abu Azmi ) जोरदार टीका केली. ( Sangram Jagtap narrated to Abu Azmi: He said ... )
कापड बाजारातील व्यापाऱ्यांच्या अहमदनगर व्यापारी महासंघातर्फे आज ( मंगळवारी ) कापड बाजारातील महात्मा गांधी रस्त्यावर हॉकर्सच्या हेकेखोरी कंटाळून मुख्य बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनास शहरातील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, संजय शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व त्यांचे पदाधिकारी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व त्यांचे पदाधिकारी, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी, यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी, हिंदूराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक संघटनांनी या व्यापाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन सर्वांनी पाठिंबा दिला आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, मुंबईत अलिशान बंगल्यात राहून राजकारण करत अहमदनगरच्या प्रश्नावर काही तरी बेताल वकत्यव्य करायचे. ज्यांना अहमदनगर कोठे आहे. तेथील नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न काय आहेत, हेही माहिती नसणाऱ्यांनी बाजारपेठेच्या प्रश्नावर बोलणे उचित ठरणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, आज शहरातील सर्वच पक्ष या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले असून त्यांचे मी स्वागत करतो. यापुढेही शहर विकासाबाबत आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
व्यापारी टिकला तरच शहर टिकेल : कदम
शहरातील व्यापारी टिकला तर शहर टुकणार आहे, कोट्यावधीचे कर्ज घऊन व्यापारी आपला व्यावसाय ताटतात. हे हॉकर्स त्यांच्या दुकानासमोर आपल्या हातगाड्या, पथाऱ्या लावुन व्यापाऱ्याचे नुकसान करत आहेत. सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी राजकारणाला तिलांजली देऊन या कापड बाजारातील व्यापाऱ्यांच्या मागे संघटीत पणे उभे राहण्याची ही वेळ आहे. शहरात या हॉकर्सवाल्यांना प्रशासनाने अनेक जागा उपलब्ध करून दिल्या आहेत तेथे ते जात नाहीत, असे संभाजी कदम यांनी सांगितले.अभिषेक कळमकर म्हणाले, शहरातील मनपा यंत्रणा, पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन कमकुवत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा व्यापाऱ्यांचा प्रश्न सुटत नाही, असा आरोप केला.
भगवान फुलसौंदर म्हणाले, बाजारासह शहरात कायम स्वरूपी अतिक्रमण पथक कार्यरत करून शहरातील स्वच्छतागृह व शौचालयाचा प्रश्न निकाली काढायला हवा. या वेळी सावेडी उपनगरातील व्यापार असोसिएशनचे शिवाजी चव्हाण व पदाधिकारी यांनीही कापडबाजार व्यापारी महासंघास लेखी पाठिंबा दिला आहे. यावेळी कापडबाजार असोसिएशनचे किरण व्होरा, ईश्वर बोरा, संजय चोपडा, सुभाष बायड, महावीर कांकरिया यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्या आयुक्त हटाओच्या घोषणा
महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास व्यापाऱ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. या प्रसंगी महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे, शहर अभियंता सुरेश इथापे आदी त्यांच्या समवेत होते. अतिक्रमणे हटविण्याबाबत लेखी आश्वासनाची व्यापाऱ्यांनी मागितले. व्यापाऱ्यांनी आयुक्त हटाओच्या घोषणा देण्यास सुरवात करताच महापालिका आयुक्तांनी अतिक्रमणे हटविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.