`बाळासाहेब थोरात हे तर नात्याने मामा, तरी मी कधी काँग्रेसची कास धरली नाही...`

संग्राम कोते हे राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) सोडून काँग्रेस ( Congress ) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे.
Ajit Pawar & Sangram Kote

Ajit Pawar & Sangram Kote

Sarkarnama

Published on
Updated on

अहमदनगर : राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले संग्राम कोते हे राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) सोडून काँग्रेस ( Congress ) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे. यावर संग्राम कोते यांच्याशी संपर्क साधला असता या चर्चा निर्थक असून मी राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सोडणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. Sangram Kote said, "Even though I am Mama as Balasaheb Thorat, I have never held the hand of Congress ...

सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना संग्राम कोते म्हणाले, मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडिया व इतर काही माध्यमातून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा सुरू आहे. चर्चा निर्थक आहेत. मी पक्ष स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शिर्डी शहर अध्यक्ष पदापासून ते युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत प्रवास मागील 17 वर्षांत केला आहे.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar &amp; Sangram Kote</p></div>
साईसंस्थानच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीचे संग्राम कोते नाराज आहेत का?

ते पुढे म्हणाले की, साईबाबा संस्थानच्या ज्या पदासाठी मी इच्छुक होतो. त्या पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप प्रयत्न केले पण तीन पक्ष्यांच्या आघाडीमुळे मर्यादा आल्या. मी महाविद्यालयीन जीवनापासून ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चाहता व कार्यकर्ता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मामा असतानाही आणि काँग्रेसमध्ये मोठी संधी असतानाही मी कधी पक्ष सोडण्याचा विचार केला नाही. करणारही नाही.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar &amp; Sangram Kote</p></div>
सत्यजित तांबे-संग्राम कोते : नगर जिल्ह्यातील दोन मावसभावांकडे दोन्ही काॅंग्रेसचे युवा नेतृत्त्व

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात असताना मी केलेल्या कामाचे शरद पवार, अजित पवार व सर्वच नेत्यांनी कौतुक केले आहे. ही सर्वाधिक समाधानाची बाब आहे. यापुढे ही पक्ष देईल ती जबादारी पारपाडू. बाळासाहेब थोरात यांचे आशीर्वाद व पाठबळ नेहमी आहेच. नाते आणि राजकारण वेगळे आहे, असेही संग्राम कोते यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com