Sanjay Mandlik : मंडलिक गट वाढवणार मुश्रीफांचे टेन्शन; 'या' जागेवर केला दावा

Sanjay Mandlik कागल विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे टेन्शन आधीच वाढला आहे. त्यातच आता ही मागणी करून महायुती मधून टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
Sanjay Mandlik
Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच कागल विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गळाला लागल्यानंतर शरद पवार यांचे एकेकाची खंदे कार्यकर्ते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याच विरोधात घाटगे यांची उमेदवारी असणार आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे टेन्शन आधीच वाढला आहे.

शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) अशीच लढत कागलमध्ये होत असल्याने निष्ठावंत कार्यकर्ते देखील जोमाने कामाला लागले आहेत. अशातच महायुती मधून टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. या मतदारसंघातून माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांची पुत्र वीरेंद्र मंडलिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे.

महायुतीकडून कागल तालुक्यातून ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. डॉ. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे. या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी श्रीक्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे दर्शन घेतले व पदाधिकारी बैठकीस मार्गदर्शन केले. त्यावेळी या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.

Sanjay Mandlik
Aditi Tatkare : लाडक्या बहिणीच्या यशाचा विरोधकांना त्रास होतोय; आदिती तटकरेंचा हल्लाबोल

कागल विधानसभा (Kagal Vidhansabha) मतदारसंघातील गावागावात मंडलिक गटाची ताकद आहे. साखर कारखाना, शिक्षण संस्था, पतसंस्था, सेवा संस्था, दूध संस्था व अन्य संस्थांच्या माध्यमातून कर्मचारी आणि कार्यकर्ते यांची व्यक्तिगत फळी निर्माण केली आहे. या मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एक भक्कम जाळे असून, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मागे ते उभे आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.

Sanjay Mandlik
Aditi Tatkare : लाडक्या बहिणीच्या यशाचा विरोधकांना त्रास होतोय; आदिती तटकरेंचा हल्लाबोल

मुश्रीफ यांच्यावर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचा रोष

माजी खासदार संजय मंडलिक यांनी महायुतीचे उमेदवार कोणीही असो त्यांच्या मागे मी ठाम उभा आहे. असे भल्या सभेत जाहीर केले असले तरी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचा रोष कायम आहे. त्याला राजकीय पार्श्वभूमी असली तरी अलीकडच्या काळात लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांना मिळालेले कमी मताधिक्य आणि गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचा केलेला पराभव, या दोन कारणांमुळे कार्यकर्त्यांचा मुश्रीफ यांच्यावर रोष कायम असल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com