Aditi Tatkare : लाडक्या बहिणीच्या यशाचा विरोधकांना त्रास होतोय; आदिती तटकरेंचा हल्लाबोल

CM Ladki Bahin Yojana : अजितदादांनी अर्थसंकल्प मांडला. या योजनेची संकल्पना मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांची आहे. फडणवीस यांच्या संघटनेने देखील ‘देवा भाऊ’ या नावाने लाडकी बहिण योजनेची प्रसिद्धी केली आहे
Aditi Tatkare
Aditi Tatkare Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 September : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला राज्यभरातून मिळत असलेल्या यशामुळे विरोधकांना त्रास होतो आहे, त्यामुळे विरोधक फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare )आज सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाली, तेव्हा महायुतीने ही योजना आणली असा उल्लेख तीनही पक्षांकडून झालेला आहे. महायुतीमध्ये सगळं काही अलबेल असून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही प्राधान्य देतोय. योजनेला मिळत असलेल्या यशामुळे विरोधकांना कुठेतरी त्रास होतोय.

लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) जाहिरातीच्या मुद्यावरूनही तटकरे यांनी विरोधकांना सुनावले. त्या म्हणाल्या, ‘माध्यमं ज्याला जाहिरात म्हणतात, तो पार्टीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पब्लिश करण्यात आलेला आहे. मात्र, माध्यमांनी तो जाहिरात म्हणून पेजवरून घेतला आहे, कोणत्याही न्यूज चॅनेलला जाहिरात दिलेली नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार करत असतो.

Aditi Tatkare
Rupali Chakankar Vs Rupali Thombre : आमदारकीवरून राष्ट्रवादीच्या दोन 'रूपाली' आमने सामने

उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्प मांडला. या योजनेची संकल्पना मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संघटनेने देखील ‘देवा भाऊ’ या नावाने लाडकी बहिण योजनेची प्रसिद्धी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे लाडकी बहीण योजना अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

तटकरे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलणार, मुस्लिम समाजाला अडीअडचणी येतील, असे फेक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान भक्कम असून ते बदलण्याची कोणाचीही मानसिकता नाही.

Aditi Tatkare
Anjali Damania : दमानियांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याने हात जोडले; तर युवक अध्यक्ष म्हणतात, ‘मी त्यांच्यावर बोलणार नाही’

विरोधकांना असं वाटतं की लोकसभेला संविधान बदलण्याचा मुद्दा चालवला. आता विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न चालू. छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे त्यांचं नाव घेऊन राजकारण होऊ नये, असं आम्हाला वाटतं, असेही त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com