"मोठ्या भावाला भेटायला लागतयं" ; मतदान केंद्रावरचं मंडलिकांनी घेतला मुश्रीफांचा आशीर्वाद

KDCC Bank election : कोल्हापूरकरांना एक आवाक करणारे पण तेवढंच सुखावणारेही दृश्य बघायला मिळाले.
sanjay Mandlik meets Hasan Mushrif

sanjay Mandlik meets Hasan Mushrif

Sarkarnama

Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी (KDCC) आज चुरशीचे मतदान पार पडले. सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी अशा सामन्याचा निकाल आता ७ तारखेला लागणार आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्याला पुन्हा एकदा मंडलिक - मुश्रीफ गटाची ईर्षा पाहायला मिळाली आहे. मात्र आज मतदानादिवशी कोल्हापूरकरांना एक आवाक करणारे पण तेवढंच सुखावणारे दृश्य बघायला मिळाले.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या २१ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्यानंतर १५ जागांसाठी निवडणूक लागली आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारेच नेते एकमेकांवर टिका करताना दिसून आले. सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), मंत्री सतेज पाटील (Satej Patil), आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांच्या नेतृत्वात मैदानात उतरली आहे. तर शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या नेतृत्वात लढाईत उतरली आहे. दोन्ही गटांकडून प्रचाराच्या फैऱ्या झडल्यानंतर आज मतदान पार पडले.

<div class="paragraphs"><p>sanjay Mandlik meets Hasan Mushrif</p></div>
सावधान: 15 जानेवारीपर्यंत दुसरा डोस न घेतल्यास व्हावे लागणार क्वारंटाईन

या दरम्यान कागल येथील श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज या एकाच मतदान केंद्रावर सत्तारूढ पॅनलचे प्रमुख हसन मुश्रीफ आणि विरोधी पॅनेलचे प्रमुख खासदार संजय मंडलिक यांनी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच ठिय्या मारला होता. मुश्रीफ आणि मंडलिक या दोघांनीही मतदान केंद्रावर तीन ते चार तास थांबून मतदारांचे स्वागत केले. सत्तारूढकडून पिवळ्या टोप्या तर विरोधी पॅनलकडून भगव्या टोप्या परिधान करून मतदार मतदान केंद्रावर येत राहिले.

<div class="paragraphs"><p>sanjay Mandlik meets Hasan Mushrif</p></div>
पंतप्रधान मोदी परत का गेले? अखेर मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर

मात्र या दरम्यान अचानक "मोठ्या भावाला भेटून यायला लागतंय" अस म्हणत खासदार संजय मंडलिक यांनी मतदान केंद्राबाहेर सत्तारुढ गटाच्या बुथमध्ये बसलेल्या ग्रामविकास हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आवक झाले. दोन मिनिटाच्या भेटीनंतर पुन्हा खासदार मंडलिक मतदाराच्या स्वागतासाठी केंद्राबाहेर उभे राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com