संजय राऊत दीड तास ट्राफिकमध्ये अडकले अन्...

Sanjay Raut| Kolhapur| संजय राऊत रविवारी (२९ मे) कोल्हापूरची सभा संपवून ते मुंबईकडे निघाले होते.
Sanjay Raut latest news, Shivsena News
Sanjay Raut latest news, Shivsena News
Published on
Updated on

सातारा : अलीकडच्या काळात महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. तासनतास वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य प्रवासी दररोज या समस्येला तोंड देत असतात.मात्र अनेकदा नेते मंडळींच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवलीही जाते. त्यामुळे सर्वसामान्याप्रमाणे नेतेमंडळींना व्हीआयपी लोकांना या वाहतुकीचा त्रास जाणवत नाही. पण आता याच वाहतूक कोंडीचा फटका शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही बसला आहे. (Sanjay Raut latest news)

पुणे-बंगळुरु महामार्गावरील सातारा-पुणे मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत संजय राऊत एकाच ठिकाणी तब्बल दीड तास खोळंबले होते. संजय राऊत रविवारी (२९ मे) कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूरची सभा संपवून ते मुंबईकडे निघाले होते. पण परत येताना सातारा पुणे मार्गावर तब्बल दीड तास त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. ज्यामुळे राऊत चांगलेच वैतागले होते.

Sanjay Raut latest news, Shivsena News
Rajya Sabha elections : काँग्रेसकडून मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी

नक्की काय झालं?

त्यांच काय झालं, कोल्हापूरची सभा संपवून संजय राऊत मुंबईकडे निघाले होते. पुढे दोन मागे दोन अशा गाड्यांचा ताफही त्यांच्यासोबत होता. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचल्यावर रात्री अकराच्या दरम्यान खंडाळा घाटाच्या अलीकडे असतानाच संजय राऊत आणि त्यांचा ताफा गर्दीत अडकला. त्यांना पुढेही जाता येईना आणि मागेही. गाडी राँग साईडनेही घेता येईना. ताफ्यातील पोलीस आणि सोबतचे कार्यकर्तेही पुरते हैराण चांगलेच वैतागले.

मग या भागातील काही शिवसैनिकांना राऊत ट्राफिकमध्ये अडकल्याची माहिती समजली आणि पाच-दहा शिवसैनिक त्यांच्या मदतीला आले. स्थानिक शिवसैनिकांनी गाडी डीवायडरवरुन कोल्हपूर दिशेला जाणाऱ्या मार्गावर काढली आणि राँग साईडने गाडी हळूहळू पुढे आणली. इथे काही अंतरावर असलेल्या आराम हॉटेलचे मालक रोहन भातोसे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी संजय राऊतांना वाहतूक सुरळीत होईपर्यंत त्यांच्या हॉटेलमध्ये थांबण्याची विनंती केली.

वैतागलेले संजय राऊत महामार्गावर अडकलेल्या गाड्यांमधून वाट काढत चालत निघाले. सुमारे 200 मीटरचा पायी चालल्यावर ते आराम हॉटेलमध्ये पोहोचले. तर तिथेही सेल्फी आणि फोटोसाठी लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी हॉटेलच्या व्हीआयपी रुमचा ताबा घेतला पण अर्धा तास झाला तर वाहतूक काही सुरळीत होत नव्हती. भूक लागल्याने त्यांनी तिथेच फ्रेश होऊन जेवणही केलं. तोपर्यंत सातारा पोलिसांनी घाटातील वाहतूक सुरळीत केली होती. तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि संजय राऊतांची सुटका झाली.

मुंबईकडे निघताना ज्या शिवसैनिकांनी राऊतांची या वाहतूक कोंडीतुन सुटका केली त्यांचाही त्यांनी खास कौतुक केलं. तर शिवसैनिकांनीही त्यांचा भगवी शाल देऊन सत्कार केला आणि राऊतांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com