Shahaji Bapu Patil On Raut: ''संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गुंड..''; शहाजीबापूंचा पलटवार

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंडांची टोळी घेऊन अयोध्येला गेले...
Sanjay Raut and 
Shahjibapu Patil
Sanjay Raut and Shahjibapu PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह अयोध्या दौरा केला. हा दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. पण याचवेळी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंडांची टोळी घेऊन अयोध्येला गेले असून अयोध्यानगरीत प्रभू रामाच्या दर्शनाला गेले होते की शक्तीप्रदर्शन करायला? असा सवाल राऊतांनी विचारला होता. त्यावर शहाजीबापूंनी पलटवार केला आहे.

राज्यातील सत्तांतरावेळी गुवाहाटी दौऱ्यात शिंदे गटाचे नेते व आमदार शहाजीबापू पाटील(Shahajibapu Patil) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. बापू म्हणाले, संजय राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गुंड आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी ५५ आमदारांना शरद पवारांच्या झोळीत टाकलं अशी टीकेची झोड उठवली आहे.

Sanjay Raut and 
Shahjibapu Patil
ShahajiBapu Patil News : गुवाहाटी दौरा गाजवणारे शहाजीबापू पाटील आयोध्येला का गेले नाहीत? : हे आहे कारण...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा गुंड म्हणून संजय राऊतांचं नाव घ्यावं लागेल. कारण त्यांनी अडीच वर्षापूर्वी गुंडगिरी आणि मोठी चोरी केली. शिवसेनेचे ५५ आमदार कसे शरद पवारांच्या झोळीत टाकले? हे आम्हाला कळालंही नाही. हा माणूस खरा गुंड आहे.

संजय राऊत हा माणूस खरा चोर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला चोर म्हणायचं काहीही कारण नाही. तसेच चोरी त्यांनीच केली होती. आधी भाजपा-शिवसेनेची युती होती, त्यामुळे आम्हाला बहुमत मिळालं. पण रातोरात काळंबेर करून सगळं बिघडून टाकलं असा टोलाही शहाजीबापूंनी राऊतांना लगावला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com