कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. राज्यसभेची सहावी जागा ही शिवसेनेची आहे. त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार आणायचा, हे आधीच ठरलं होतं. मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना असं सांगितलं होतं की राज्यसभेसाठीच्या पुरस्कृत उमेदवारीबाबत मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावं लागेल, एवढंच ते संभाजीराजेंना बोलले आहेत, असा खुलासा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. (Sanjay Raut's revelation about dialogue between Sambhaji Raje and Uddhav Thackeray)
शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला, त्यावेळी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यामध्यक काय संवाद झाला होता, हेच सांगून टाकले. खासदार राऊत म्हणाले की, संभाजीराजेंनी काल आपलं मन मोकळं केलं आहे, त्यामुळे आमच्यासाठी तो विषय आता संपला आहे.
राज्यसभेत पोचण्यासाठी ४२ मतांचा विषय होता, तुम्हाला जर राजकारणात करिअर करायचे असेल तर राजे, महाराजांना कोणत्यातरी पक्षाचा हात धरावाच लागतो. देशातील अनेक राजकीय घराणी कोणत्या तरी पक्षांशी संबंधित आहेत. तो राजकीय विचार घेऊनच पुढे जायचे असते. आम्ही संभाजीराजे यांना विनंती केली होती, त्यांनी ती स्वीकारली नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
संभाजीराजे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यावर सर्व कोल्हापुरातून अभिनंदनाचा वर्षाव आहेत. आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या टीकेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, शिवेंद्रसिंहराजे हे अपक्ष आहेत का? संभाजीराजे यांनी आतापर्यंत किती पक्ष बदलले आहेत. त्यांना पक्षाचे वावडे आहे का. त्यांच्या घराण्यामध्ये कोणी कितीवेळा पक्ष बदलेले. कोणकोणत्या पक्षात गेले. कशासाठी आम्हाला तोंड उघडायला लावता. महाराजांच्या गादीविषयी आम्हाला आदर आहे, तो कायम राहील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.