Sharad Pawar: शरद पवारांच्या दौऱ्यामुळे धुळ्यात राष्ट्रवादीला बळ

शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी होणार विविध कार्यक्रम.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

शिरपूर : खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दौऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) बळ मिळणार आहे. धर्मांध शक्तींविरोधात ठामपणे उभे राहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमांने बळ मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी सांगितले. (Sharad Pawar`s visit will gove boost to NCP organisation)

Sharad Pawar
Nashik News: मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवारांना यंदा संधी हुकली!

धुळे येथील राष्ट्रवादी भवनाचे नूतनीकरण झाले आहे. त्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी श्री पवार हे शनिवारी धुळे दौऱ्यावर आहेत.

Sharad Pawar
Nashik Breaking; शिवसेनेने इशारा देताच ४ हल्लेखोर पोलिसांकडून अटक

खासदार पवार नाशिकहून शनिवारी सकाळी साडेआठला धुळ्याकडे प्रयाण करतील. सकाळी साडेअकराला धुळे शहरालगत चाळीसगाव चौफुली येथे ते दाखल होतील. मिरवणुकीने ते गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये पोचतील. दुपारी १२.१५ ते १.३० या वेळात राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचा अनावरणाचा कार्यक्रम खासदार पवार यांच्या हस्ते होईल. दुपारी दीडला ते मल्हार बागेत असतील. तेथे दुपारी तीन ते साडेतीनपर्यंत पत्रकार परिषद होईल. दुपारी साडेतीन ते चार यादरम्यान विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी ते घेतील. नंतर नाशिककडे प्रयाण करतील.

शिष्टमंडळात समाविष्ट होणाऱ्या सदस्यांनी आपली नावे शुक्रवारी पारी चारपर्यंत राष्ट्रवादी भवनात द्यावीत. तेथे संबंधितांना प्रवेशाचे पास दिले जातील. पासशिवाय कोणालाही खासदार पवार भेटणार नाहीत, असे माजी आमदार गोटे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जमावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी भवनातील कार्यक्रमासह खासदार पवार यांच्या स्वागतासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील, निरीक्षक अर्जुन टिळे आदींनी केले आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com