समरजितसिंह घाटगेंचे शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम त्यावेळी कुठे गेले होते?

संताजी घोरपडे कारखाना एकरकमी २९६० रुपये एफआरपी देणार : हसन मुश्रीफ
Santaji Ghorpade sugar factory
Santaji Ghorpade sugar factorySarkarnama
Published on
Updated on

सेनापती कापशी (जि. कोल्हापूर) : ‘‘आगामी हंगामात गाळप होणाऱ्या उसाला एकरकमी २,९६० रुपये एफआरपी आणि एक जानेवारीपासून कामगारांना वेजबोर्डही लागू करण्याची घोषणा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचा सातवा गळीत हंगामाप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे होते. (Santaji Ghorpade factory to give a One time of Rs 2960 FRP : Hasan Mushrif)

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘एकरकमी एफआरपी देणे कर्तव्यच आहे, त्यामुळे कोणीही टीमकी वाजवण्याची गरज नाही. आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. लवकरच नागणवाडीही पूर्ण होईल. त्यानंतर हक्काचा ऊस पिकेल. गाळप क्षमता दहा हजार टन, ५० मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज एक लाख लिटर इथेनॉलनिर्मिती असा विस्तारवाढ करणार आहे. नऊ लाख टन गाळपासह ११ कोटी युनिट वीजनिर्मिती, सव्वा कोटी लिटर इथेनॉल व ५० लाख लिटर रेक्टिफाईड स्पिरिट उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.’’

Santaji Ghorpade sugar factory
हेच ते पत्र ज्यामुळे रामदास कदम अडचणीत आले

प्रताप उर्फ भय्या माने म्हणाले, ‘‘सात वर्षे वयाचा कारखाना प्रस्थापित कारखान्यांच्या बरोबरीने दर आणि शेतकऱ्यांना सोईसुविधा देत आहे.’’ कर्मचारी संजय पाटील (भडगाव) यांनी महिन्याचा पगार मंत्री मुश्रीफ यांच्या न्यायालयीन दाव्याच्या खर्चासाठी दिला. युवराज पाटील, सतीश पाटील, मनोज फराकटे, शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील, सूर्याजी घोरपडे उपस्थित होते. अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वागत केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी केले.

जालिंदर पाटील, सावकर मादनाईक यांच्या भेटीचा किस्सा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या वेळी प्रा. जालिंदर पाटील, सावकर मादनाईक यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. ते त्यांना म्हणाले, ‘‘इतर जिल्ह्यांत कर्जमुक्त कारखाने तीन टप्प्यात एफआरपी देतात. शेतकरी संघटनेने कारखाना बंद पाडल्याने शिरोळमधील चार कारखाने एकरकमी एफआरपी देतात. अशा स्थितीत त्यांना आवाहन केले, की व्यक्तिगत नव्हे; परंतु एक कर्ज नसलेला साखर कारखाना भाड्याने घ्या, तो आदर्शवत चालवून दाखवा. तुमच्या पावलावर पाऊल टाकून कारखाना चालवण्याचे तुमचे आदर्श घेऊ.’’

Santaji Ghorpade sugar factory
मोठी बातमी : ‘इन्कम टॅक्स’कडून एकाही साखर कारखान्यावर कारवाई होणार नाही

‘अन्नपूर्णा’कडे ऊस जाण्याची त्यांना भीती

प्रवीणसिंह भोसले म्हणाले की, ‘‘सगळेच एकरकमी एफआरपी देत आहेत मग ‘शाहू’ने दिल्याचा डांगोरा पिटण्याची काय गरज. संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा कारखान्याला मिळणारा प्रतिसाद पाहून ऊस तिकडे जातोय, या भीतीने हा गवगवा समरजितसिंह घाटगे करीत आहेत. पाच वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने गाळप बंदची हाक दिली, तेव्हा तलवारी आणि बंदुका घेऊन ऊस आणून गाळप केले. त्यावेळी शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम कुठे गेले होते.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com