Sarkarnama Analysis : उदयनराजे की शशिकांत शिंदे; 'होम ग्राऊंड'वर कोणाला मिळणार धक्का?

Shashikant Shinde vs Udayanaraje Bhosale : उदयनराजेंना झालेल्या गेल्यावेळच्या मतदानापेक्षा यावेळचे आकडे निश्चितच कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, 2019 च्या दोन निवडणुकीत 45 ते 46 हजारांत असलेले उदयनराजेंचे मताधिक्य यावेळेस घटण्याची भीती आहे. त्यामुळे साताऱ्यात कोणी कोणाचे काम केले? याची उत्सुकता आहे.
Shashikant Shinde Udayanaraje
Shashikant Shinde UdayanarajeSarkarnama

Satara Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक लक्ष लागलेले खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या होम ग्राउंडवर सातारा व जावळीकरांनी कोणाला साथ दिली? याची उत्सुकता ताणली आहे. सातारा शहरात (Satara Loksabha) 58.30 सातारा ग्रामीण 67.57 आणि जावळीत 64.33 टक्के असे एकूण 62.74 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

गेल्यावेळच्या तुलनेत सातारा शहरात मतदान घटले, तर सातारा ग्रामीण व जावळीत वाढले आहे. त्यामुळे उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) झालेल्या गेल्यावेळच्या मतदानापेक्षा यावेळचे आकडे निश्चितच कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, 2019 च्या दोन निवडणुकीत 45 ते 46 हजारांत असलेले उदयनराजेंचे मताधिक्य यावेळेस घटण्याची भीती आहे. त्यामुळे साताऱ्यात कोणी कोणाचे काम केले? याची उत्सुकता आहे. Loksabha Election 2024

सातारा-जावळी लोकसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकींची आकडेवारी पाहता 44 ते 46 हजारांपर्यंत मताधिक्य मिळाले आहे. मुळात सातारा, जावळी मतदारसंघात सातारा शहर, जावळी, सातारा ग्रामीण असे विभाग आहेत. गेल्या दोन निवडणुकींपैकी राष्ट्रवादीत असूनही उदयनराजेंना 44 हजार 956 इतके मताधिक्य मिळाले होते, तर दुसऱ्यावेळी भाजपमधून लढताना हे मताधिक्य थोडे वाढून 46 हजार 034 झाले होते. 2024 ची यावेळची निवडणूक ही वेगळी आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व विरोधातील आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) या दोघांचेही हे दोन तालुके होम ग्राउंड आहेत. त्यामुळे इतर विधानसभा मतदारसंघांपेक्षा सातारा, जावळीतून कोण मताधिक्य घेणार? याची उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जावळीत तालुक्याचे सुपुत्र असल्याने त्यांनाही चांगले मतदान मिळणार, हे निश्चित आहे. तर सातारा व शहरात उदयनराजेंचे प्राबल्य असल्याने सर्वांना येथून उदयनराजेंनाच मताधिक्य मिळेल, असे वाटत आहे. पण आकडेवारी पाहता येथे मत परिवर्तन झाल्याचे जाणवत आहे. नुकत्याच झालेल्या मतदानात सातारा-जावळीतून तीन लाख 35 हजार 751 मतदारांपैकी दोन लाख 10 हजार 656 मतदान झाले आहे. याची टक्केवारी 62.74 आहे. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendraraje Bhosale) पळून काम केले आहे? त्या प्रमाणात साताऱ्यातील उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी काम केले आहे का? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या मतदानामध्ये सातारा शहरातील एक लाख 39 हजार 282 मतदानापैकी 81 हजार 203 मतदान झाले आहे. याची टक्केवारी 58.30 येते. त्यामुळे शहरात कमी प्रमाणात मतदान झाल्याचे चित्र आहे.

Shashikant Shinde Udayanaraje
Pune Loksabha News : अबब..! तब्बल 69 ईव्हीएम पडले बंद; प्रशासनाचा भोंगळ कारभार

तर सातारा ग्रामीण (Satara Gramin) ज्या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंचे वर्चस्व आहे, या ठिकाणी एक लाख दोन हजार 986 मतदानापैकी 69 हजार 584 मतदान झाले आहे. याची टक्केवारी 67.57 आहे, तर जावळी तालुक्यात 93 हजार 483 मतदानापैकी 59 हजार 855 मतदान झाले असून, त्याची टक्केवारी 64.2 आहे. त्यामुळे सातारा ग्रामीण व जावळीत वाढलेले मतदान हे कमळाला की तुतारीला? यावरच मताधिक्याचे गणित अवलंबून आहे. सातारा शहराने उदयनराजेंना साथ दिली की बदलासाठी शशिकांत शिंदेंना, हे मतमोजणीनंतरच समजणार आहे; पण सध्यातरी मतदानाच्या आकडेवारीवरून शहरातील मतदारांची नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार? याचीच उत्सुकता असणार आहे. election analysis of satara constituency

2024 : सातारा-जावळी

एकूण मतदान : तीन लाख 35 हजार 751

झालेले मतदान : दोन लाख 10 हजार 656

टक्केवारी : 62.74

........................

2019 ची पोटनिवडणूक

एकूण मतदान : तीन लाख 36 हजार 368

झालेले मतदान : एक लाख 98 हजार 650

टक्केवारी : 59.06

Shashikant Shinde Udayanaraje
Nagar Loksabha Election : मतदानाचा टक्का घसरला; विखे, लंके, लोखंडे, वाकचौरे सर्वच तणावात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com