Nagar Loksabha Election : मतदानाचा टक्का घसरला; विखे, लंके, लोखंडे, वाकचौरे सर्वच तणावात...

Voting Percentage Drop नगर दक्षिणसाठी सरासरी 63.77 तर, शिर्डीसाठी 61.13 टक्के मतदान झाले. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली.
Nilesh Lanke, Sujay Vikhe, Bhausaheb Wakchaure
Nilesh Lanke, Sujay Vikhe, Bhausaheb Wakchauresarkarnama

Nagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. नगर दक्षिणसाठी सरासरी 63.77 तर, शिर्डीसाठी 61.13 टक्के मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 64.26 टक्के मतदान झाले होते. यंदा यात अर्ध्या टक्क्यांची घसरण होऊन 63.77 टक्के मतदान झाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 64.54 टक्के मतदान झाले होते. यंदा यात साडेतीन टक्के मतदानाची घसरण नोंदवली जाऊन 61.13 टक्के मतदान झाले.

मतदानाचा टक्का घसरल्याने नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा या दोन्ही मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांच्या तंबूत चिंतेचे वातावरण आहे. नगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार खासदार डाॅ. सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके तर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या प्रमुख उमेदवारांमध्ये तंबूत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सुरूवातीपासून तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि नीलेश लंकेंचे कार्यकर्ते एकमेकांना शह देत होते. समाज माध्यमांवर दोघांच्या समर्थकांमध्ये वाॅर रंगला होता. पैसे वाटपाचे आरोप झाले. वडझिरे (ता. पारनेर) येथे रस्त्यांवर पैसे पडले होते. यावरून आमदार रोहित पवार यांनी विखेंवर आरोप करत पैशांची धुवाँधार बरसात, असे ट्विट केले.

Nilesh Lanke, Sujay Vikhe, Bhausaheb Wakchaure
Nagar Lok Sabha : नगर दक्षिणची निवडणूक विखे कोर्टात घेऊन जाणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा

पारनेरमध्ये भाजपचे राहुल शिंदे यांचे वाहन नीलेश लंके समर्थकांनी फोडले. तसेच वाहनातील कागदपत्रांची फेकाफेक केली. गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतल्याची तक्रार राहुल शिंदेंनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली. अनिल दत्तात्रय गंधाक्ते यांच्या फिर्यादीवरून राहुल शिंदे, विजय सदाशिव औटी आणि सचिन मच्छिंद्र वराळ यांच्यासह 22 जणांविरोधात फिर्याद दिली.

महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखेंची समाज माध्यमांवर बदनामी केल्याचा आरोप करत नीलेश लंके प्रतिष्ठान पाथर्डी या समाज माध्यमांवरील ग्रुपमधील लोकनेते समाज माध्यमाच्या नावाने असलेल्या एका मोबाईलधारकाविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला. विखेंचे प्रचारक माजी नगरसेवक निखिल वारे यांनी फिर्याद दिली.

Nilesh Lanke, Sujay Vikhe, Bhausaheb Wakchaure
Ajit Pawar Vs Nilesh Lanke : शरद पवारांना उद्देशून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर नीलेश लंकेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

घुमटवाडी (ता. पाथर्डी) येथील मतदान केंद्रातील अधिकारी यांच्याकडे महायुतीचे उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य आढळले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत महायुतीच्या उमेदवाराला अधिकारी मदत करत असल्याचा आरोप करत मतदान केंद्र बंद पाडले. यानंतर तहसीलदार उद्धव नाईक यांनी तेथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी हटवून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

Nilesh Lanke, Sujay Vikhe, Bhausaheb Wakchaure
Shirdi Loksabha : खासदार लोखंडे म्हणजे ‘मिस्टर इंडिया’, उत्कर्षा रुपवतेंचा टोला

मतदाराच्या बोटाला शाई लावून आणि त्यानंतर त्यांना पैसे देऊन मतदान केंद्रावर जाऊन दिले जात नव्हते. जीपीओ चौकातील कॅटोंन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुलात हा प्रकार झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंनी स्वतः तिथे छापा घालून हा प्रकार उघडकीस आणला. ही व्यक्ती विखे समर्थक असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारांच्या स्लिपा, शाईची बाटली तिथे आढळली.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Nilesh Lanke, Sujay Vikhe, Bhausaheb Wakchaure
Nagar Lok Sabha Voting : नीलेश लंकेंसाठी चिंतेची गोष्ट; होम ग्राउंड पारनेरमध्ये सर्वांत कमी मतदान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम आणि विक्रम राठेड यावेळी उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीत अशा किरकोळ घटना वगळता नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडल्याचा दावा माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

Nilesh Lanke, Sujay Vikhe, Bhausaheb Wakchaure
Shirdi Lok Sabha Election : उत्कर्षा रूपवतेंनी 'हात' सोडला; काँग्रेसला झटका अन् ठाकरे गटाला धडकी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com