Mahesh Pilankar Case : बेपत्ता सरपंच पिळणकर प्रकरणात पोलिस अधिक्षकांचा मोठा निर्णय, कुटुंबाची 'ती' मागणी मान्य, आता तपास...

Mahesh Pilankar Kolhpur Police SIT : सरपंच महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी पोलिस अधिक्षकांनी मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
 ramdas ingwale Mahesh Pilankar
ramdas ingwale Mahesh Pilankarsarkarnama
Published on
Updated on

Kolhpur Police News : गेल्या दोन महिन्यांपासून भुदरगड तालुक्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे बेपत्ता आहेत. परिसरात जळालेल्या अवस्थेत काही अवशेष मिळाले. मात्र त्याबाबत कोणताच अहवाल पोलिसांकडून उघड न झाल्याने पिळणकर यांच्याबाबत घातपात झाला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून तपासात गती येत नसल्याने कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेत यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.

दरम्यान कुटुंबीयांच्या मागणीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांची एसआयटीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवाय आठ जणांची टीम यासाठी तयार करण्यात आले असून या घटनेचा सखोल तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.

उपअधीक्षक गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोरख चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, सायबरचे उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार राम कोळी आणि कॉन्स्टेबल राजू कोरे यांची एसआयटीमध्ये नियुक्ती केली आहे.

या पथकाकडून भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे जाऊन संबंधित घटने संदर्भात चौकशी केली जाणार आहे. शिवाय नातेवाईकांकडून देखील कसून चौकशी केली जाणार आहे. ज्या परिसरता अज्ञात अवशेष सापडले त्याची माहिती घेतली जाणार आहे.

 ramdas ingwale Mahesh Pilankar
Hasan Mushrif : 'गोकुळ'साठी मंत्री मुश्रीफांची सर्वोच्च न्यायालयात धाव, 1200 सभासद धोक्यात? आज सुनावणी

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. 11 जानेवारीला जंगलात पेटवलेले अवशेष पोलिसांना सापडले. मात्र सापडलेले अवशेष कोणाचे आहेत. याबाबत अद्याप तपास नाही. त्यामुळे पाटगावच्या सरपंचाचे नेमके काय झाले? याबाबत कोणालाच कल्पना नाही. कोल्हापूर पोलिसांकडून तपास रखडलेला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

कुटुंबीयांकडून मिळालेली माहितीनुसार, भुदरगड तालुक्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे 7 जानेवारी 2026 रोजी मित्रांकडे जेवायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले आहेत. मात्र ते अद्याप घरी आलेले नाहीत. कुटुंबीयांशी कोणताच संपर्क न झाल्याने गारगोटी पोलिसात त्यांच्या बाबत तक्रार केली आहे. तर कुटुंबियांना 9 जानेवारी रोजी त्यांचे वाहन मिळून आले. तर 11 जानेवारी रोजी वाहनापासून काही अंतरावर जंगलात काही अवशेष जळालेल्या अवस्थेत मिळून आले.

पिळणकर कुटुंबाची मागणी काय?

दोन दिवसापूर्वी सरपंच महेश पिळणकर यांचा मुलगा पारस पिळणकर, पत्नी तृप्ती पिळणकर यंच्यासह नातेवाईकांनी जिल्हा पोलीसप्रमुख योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली होती. या घटनेचा तपास एसआयटीकडे द्यावा, सात दिवसात तपासाची प्रगती जाहीर करावी, फॉरेन्सिक अहवाल उजेडात आणावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

 ramdas ingwale Mahesh Pilankar
PMC Budget 2026: पुणे महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पालाच कात्री? कोणत्या विभागाला झटका बसणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com